पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने (virat kohli) बुधवारी पत्रकार परिषद घेतली. दक्षिण आफ्रिका मालिकेदरम्यान विराट कोहली वनडे मालिकेत खेळणार की नाही या प्रश्नाचे उत्तर खुद्द विराट कोहलीनेच दिले.
विराट कोहली (Virat Kohali) म्हणाला की, मी विश्रांतीबद्दल बीसीसीआयशी कधीही बोललो नाही. मी एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी उपलब्ध आहे. मी वनडेचा कर्णधार होणार नाही, असा निर्णय पाच निवडकर्त्यांनी घेतला आहे. मला याआधी याची कल्पना नव्हती. मी एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध आहे.
विराट कोहलीने (Virat Kohali) सांगितले की, कसोटी संघाच्या निवडीच्या दीड तास आधी बोर्डाने त्याच्याशी संपर्क साधला होता. या बैठकीत निवडीबाबत चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्य निवडकर्त्याने कोहलीला एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवणार नसल्याचे सांगितले. खुद्द कोहलीनेही त्याला याबाबत कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट केले, ही माहिती स्वत: विराटने आज पत्रकार परिषदेत दिली.
भारतीय संघ गुरुवारी १६ डिसेंबरला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. तत्पूर्वी, भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवल्यानंतर त्याने पहिल्यांदाच संवाद साधला. यावेळी त्याने मनमोकळे पणाने गप्पा मारत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध असल्याचेही सांगितले. १९ जानेवारीपासून वनडे मालिका सुरू होत आहे. (virat kohli)
बीसीसीआयने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहली म्हणाला, 'मी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेच्या निवडीसाठी उपलब्ध आहे. वनडे मालिका न खेळण्याबाबत मी निवडकर्त्यांशी किंवा बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांशी बोललो नाही. माझ्याबद्दल काही लोक खोटे वृत्त प्रसिद्ध करत असून त्या सर्व अफवा असल्याचे त्याने स्पष्ट केले. (virat kohli)
कोहलीने पत्रकार परिषदेत त्याला वनडेच्या कर्णधारपदावरून कसं हटवण्यात आले याची माहिती दिली. कोहली म्हणाला की, जेव्हा कसोटी संघाची निवड झाली, त्यानंतर निवडकर्त्यांनी सांगितले की, तुला वनडेच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले आहे, त्यानंतर या विषयावर कोणतीही चर्चा झाली नाही, असे तो म्हणाला. (virat kohli)
कोहलीने स्पष्ट केले की, जेव्हा मी टी-20 संघाचे कर्णधारपद सोडले तेव्हा मी बीसीसीआयला दिलेल्या माहितीत काहीही चुकीचे नव्हते. सर्वांनी तो निर्णय योग्य पद्धतीने घेतला. मी निवडकर्त्यांना सांगितले की मला एकदिवसीय आणि कसोटीत कर्णधारपद भूषवायचे आहे, पण निवड समितीही निर्णय घेतल्यास मोकळी आहे. निवड समोतीने नंतर वनडे संघाच्या कर्णधार पदावरून घेतलेला निर्णय समोर आहे, असेही त्या स्पष्ट केले.