Virat Kohli T20 Ranking : विराट कोहलीची टी-20 क्रमवारीत मोठी झेप!

Virat Kohli T20 Ranking : विराट कोहलीची टी-20 क्रमवारीत मोठी झेप!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli T20 Ranking : विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा एकदा टी 20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत टॉप-10 मध्ये पोहोचला आहे. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत (T20I Rankings) त्याने सहा स्थानांची झेप घेऊन 9 वे स्थान पटकावले आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी जाहीर झालेल्या क्रमवारीत विराट 15 व्या स्थानावर होता. विशेष बाब म्हणजे गेल्या दोन महिन्यांत विराटने आपल्या क्रमवारीत 26 स्थानांची सुधारणा केली आहे. ऑगस्ट 2022 मध्ये आशिया चषकापूर्वी, तो टी-20 क्रमवारीत 35 व्या स्थानावर होता.

आशिया चषक स्पर्धेपूर्वी विराट बराच काळ फॉर्ममध्ये नव्हता. त्याच्या बॅटमधून धावा येऊ शकल्या नाहीत. यामुळेच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर राहिलेला हा दिग्गज फलंदाज ऑगस्ट 2022 मध्ये 35 व्या क्रमांकावर घसरला. मात्र, आशिया चषक स्पर्धेत विराटने चमकदार कामगिरी केली. 5 सामन्यांमध्ये त्याने 147.59 च्या स्ट्राईक रेटने 276 धावा (2 अर्धशतके, 1 शतक) फटकावल्या. स्पर्धेच्या शेवटच्या सामन्यात त्याने अफगाणिस्तान विरुद्ध नाबाद 122 धावांची खेळी साकारली. तब्बल अडीच वर्षांने त्याने शतक झळकवले. (Virat Kohli T20 Ranking)

आशिया चषकपासून विराट सातत्याने धावा करत आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशातील टी-20 मालिकेत त्याने अर्धशतके झळकावली. या बॅक टू बॅक दमदार खेळीमुळे विराटचा टॉप-15 मध्ये समावेश झाला. आता टी 20 विश्वचषक 2022 च्या पहिल्याच सामन्यात त्याने पाकिस्तानविरुद्ध 53 चेंडूत 82 धावांची शानदार खेळी खेळून पुन्हा एकदा टॉप-10 मध्ये स्थान मिळवले.

T20I मध्ये सर्वाधिक धावा

T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 110 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 51.97 च्या फलंदाजीच्या सरासरीने 3794 धावा केल्या आहेत. यादरम्यान विराटचा स्ट्राइक रेट 138.41 राहिला आहे. विराटने टी20 मध्ये एक शतक आणि 34 अर्धशतकं झळकावली आहेत. (Virat Kohli T20 Ranking)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news