पुढारी ऑनलाईन डेस्क : Afghanistani Fan kiss Hardik Pandya : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने आशिया चषक 2022 च्या अ गटातील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. टीम इंडियाच्या या विजयाचा जल्लोष सर्वत्र साजरा केला जात आहे. गेल्या वर्षी टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताला पाकिस्तानने 10 गडी राखून मात दिली होती. आता त्याच दुबईतील मैदानावर टीम इंडियाने पाक संघाला आस्मान दाखवून त्या पराभवाचा बदला घेतला आहे. भारताच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गजांनी टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे. मात्र हा आनंदोत्सव केवळ भारत किंवा भारतीयांपुरता मर्यादित नसून टीम इंडियाचा विजय अफगाणिस्तानमध्येही साजरा केला जात आहे.
वास्तविक, पाकिस्तानविरुद्ध भारताच्या रोमहर्षक विजयानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक अफगाण फॅन भारताच्या विजयावर खूप आनंदी दिसत असून तो जल्लोष करत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, काही लोक एका खोलीत बसून टीव्हीवर भारत-पाकिस्तान सामना पाहत आहेत. दरम्यान, भारताच्या विजयानंतर त्यातील एकजण आनंदाच्या भरात टीव्हीकडे धावतो आणि टीव्हीच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या हार्दिक पंड्याचे चुंबन घेतो. यानंतर तो जल्लोष करत आनंद साजरा करत दुसऱ्या खोलीत जातो. (Afghanistani Fan kiss Hardik Pandya)
सामना संपल्यानंतर काही वेळातच एका चाहत्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. आतापर्यंत 10 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ रिट्विट केला आहे. तर या व्हिडिओला 62 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. व्हिडिओ शेअर करणाऱ्या युजरनेही विजयासाठी भारताला शुभेच्छा दिल्या आहेत. (Afghanistani Fan kiss Hardik Pandya)
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंटर पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही आणि दुसऱ्याच षटकात कर्णधार बाबर आझम पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर मोहम्मद रिझवानने संघाचा डाव सांभाळण्याचा खूप प्रयत्न केला पण हार्दिक पंड्याने आपल्या शॉर्ट बॉल्सने पाकिस्तानची मधली फळी उद्ध्वस्त केली. (Afghanistani Fan kiss Hardik Pandya)
रिझवान 43 धावांवर बाद झाला आणि त्यानंतर भुवनेश्वर कुमारने अर्शदीपसह पाकिस्तानला 147 धावांवर गुंडाळले. लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवातही खराब झाली आणि दावाच्या दुसऱ्याच चेंडूवर केएल राहुल तंबूत परतला. रोहितही स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये पोहचला. नंतर विराट, हार्दिक आणि जडेजाने महत्त्वपूर्ण खेळी खेळून संघाला 19.4 षटकांत विजय मिळवून दिला. (Afghanistani Fan kiss Hardik Pandya)