IND vs PAK : हार्दिकचा रिझवानला कानमंत्र ; भारत पाक सामन्यातील ‘तो’ क्षण | पुढारी

IND vs PAK : हार्दिकचा रिझवानला कानमंत्र ; भारत पाक सामन्यातील 'तो' क्षण

पुढारी ऑनलाईन डेस्क : दुबई येथे पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेत रविवारी (२८ ऑगस्ट) भारत पाकिस्तान असा सामना झाला. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. या सामन्या दरम्यान हार्दिक आणि रिझवान या दोघांमध्ये एक कानमंत्र दिल्याच्या संवादाचा क्षण पहायला मिळाला.

दुसऱ्या इनिंगसाठी आलेला भारतीय संघ पाकने केलेल्या धावांचे आव्हान मोडून काढण्यासाठी सज्ज होता. हा सामना सुरू असतानाचा हार्दिक आणि रिझवानच्या संवादाचा किस्सा पहायला मिळाला. याच संवादांच्या क्षणांची चर्चा आता सोशल मीडियावर जोरदार होत आहे. सामना अगदी अंतिम मोडवर आलेला असतानाचे हे दृश्य होते. सर्वांच्या नजरा या क्रिकेटच्या स्टेडियमवर टिकून राहील्या होत्या. या दरम्यानच हे दोघेजण चर्चा करत असताना दिसून आले.

हार्दिक आणि रिझवानचा ‘तो’ कानमंत्राचा संवाद

सामन्याला रंगत आली होती. भारतीय संघासमोर १४८ धावांचे आव्हान होते. तीन विकेट्स गमावल्याने भारतीय चाहते हार्दिक आणि जडेजा नेमकी काय जादू करणार याकडे लक्ष ठेवून होते. सामना सुरू होता आणि या दरम्यानच हार्दिक पाकिस्तान संघाचा विकेटकिपर रिझवान याच्याजवळ गेला. यावेळी एका हातात बॅट आणि एक हात रिझवानच्या गळ्यात टाकून त्याला काहीतरी सांगत असताना पहायला मिळाला. हा संवाद त्यांच्या दोघांची घट्ट मैत्री दर्शवत होता. दोघांच्या सामन्यादरम्यान गमती जमती चालू होत्या. खरंतर हा क्षण असा वाटत होता की हार्दिकने रिझवानला काहीतरी कानमंत्र दिला. एकीकडे दोन्ही संघांवर प्रचंड दबाव होता. मात्र या दोघांच्या हसत खेळत सुरू असलेला खेळ, त्यांची मैत्री आणि कोणत्याही दबावाखाली न खेळण्याचं हे गमक यातून दिसून आलं.

संपूर्ण भारतवासियांना या सामन्यातील भारताच्या विजयाची उत्कंठा लागून राहीली होती. भारतीय संघाने नाणेफेक झिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हार्दिकच्या तीन विकेट्सनी पाकिस्तान संघाची पळता भुई थोडी झाली. पहिल्या इनिंगसाठी आलेला पाक संघ १४७ धावांवर नरम पडला. हार्दिक आणि जडेजा या जोडीने हे आव्हान मोडून काढत पाकिस्तानचा दारून पराभव केला.

हेही वाचा

Back to top button