Vikram Gokhale Death : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन

Vikram Gokhale
Vikram Gokhale

पुढारी ऑनलाईन डेस्क : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले. आज पहाटे सहा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर गेल्या १५ दिवसांपासून पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. (Vikram Gokhale Death) त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

विक्रम गोखले यांच्‍यावर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर गेल्‍या 15 दिवसांपासून उपचार सुरु होते. बुधवारी त्‍यांची प्रकृती खालावली होती.

Vikram Gokhale Death : अभिनयाची एक खासियत

विक्रम गोखले यांनी हिंदी-मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने चाहता वर्ग निर्माण केला होता. भारदस्‍त आवाज ही त्यांच्या अभिनयाला मिळालेली देणगी होती. आपल्‍या बोलक्‍या अभिनयातून त्‍यांनी अनेक भूमिकांना न्‍याय दिला. मराठीबरोबरच हिंदी चित्रपटांमध्‍ये त्‍यांनी अविस्‍मरणीय भूमिका साकारल्‍या. 
Vikram Gokhale Death
Vikram Gokhale Death
नटसम्राट, थोडं तुझं थोडं माझं, कळत नकळत, दुसरी गोष्ट, अनुमती, मी शिवाजी पार्क, आघात या सुखानों या एबी आणि सीडी हे मराठी चित्रपट त्यांचे खूप गाजले.  इंसाफ, अग्निपथ, खुदा गवाह, अधर्म, स्वर्ग नरक, हम दिल दे चुके सनम या हिंदी चित्रपटातही त्यांनी साकारलेल्‍या भूमिका आजही रसिकांच्‍या मनात घर करुन आहेत. अलिकडच्या काही दिवसात त्यांनी वेबसिरीजमधूनही अभिनय केला.  सिंहासन, मेरा नाम करेगी रोशन, उडान, क्षितिज ये संजीवनी, जीवन साथी या वेबसीरीज खूप गाजल्या.
Vikram Gokhale Death
Vikram Gokhale Death
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news