Urfi Javed : आजकालचे तरुण अंथरूणात जावून उर्फीचे फोटो पाहतात : लेखक चेतन भगत असे का म्हणाले?

Chetan Bhagat comment on Urfi Javed
Chetan Bhagat comment on Urfi Javed
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन: आजकालचे तरुण हे अंथरूणात जावून उर्फी जावेदचे (Urfi Javed) फोटो पाहतात आणि ते लाईक करतात. इंटरव्हयूला गेल्‍यावर  मला उर्फीची साडी आणि ड्रेस माहित आहे, असे सांगणार का? असा सवाल करत प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी आजच्‍या तरुणाईला केला.एका वृत्तवाहिनीव्‍दारा आयोजित कार्यक्रमात ते सोशल मीडिया या विषयावर बोलत होते.

चेतन भगत हे त्याच्या लेखनीसोबतच स्पष्टवक्तेपणामुळेही ओळखले जातात. वृत्तवाहिनीशी बोलताना  ते म्हणाले, आजकालचा युवक हा सोशल मीडियावर उर्फी जावेदचे (Urfi Javed)  फोटोला लाईक करत बसला आहे. पण यामध्ये उर्फीची काही चूक नाही. ती तर तिचे करियर बनवत आहे. आज मीही उर्फीचे फोटो पाहून आल्याचेही त्यानी प्रामाणिकपणे स्पष्ट केले आहे.

युवकांनी पुस्तके वाचण्यांसाठी वेळ खर्च करावा

इंटरनेट, डेटा या चांगल्या गोष्टी आहेत. पण यामध्ये आजकाल युवकाला कमकुवत बनवले जात आहे. अनेक युवक फोनवर दिवसभर रिल्स पाहातात, फोटो लाईक करत बसतात. त्याऐवजी युवकांनी पुस्तके वाचण्यांसाठी वेळ खर्च करावा, असा सल्ला देखील भगत यांनी दिला आहे.

मोबाईलची सवय चांगली नाही

या वेळी चेतन भगत यांनी उल्लू टीव्हीवरही टीका केली . ते म्हणाले, उल्लू काय आहे? जो रात्रीचे जागतो, जो उल्लू टिव्ही तो आहे जो रात्री पाहायला जातो. चेतन भगत यांनी सांगितले की, आमच्यावेळी मनोरंजन (Urfi Javed) खूप कमी होते. यामुळे आम्ही त्यावेळीपासून लिखाण सुरू केले. चेतन भगतने हेही सांगितले की, ज्यावेळी अभ्यास करण्याची वेळ असते, तेव्हा याच वयात डेट करणे, गर्लफ्रेंड करण्याची इच्छा ही खूप असते. पण चांगली गर्लफेंड असल्याने नोकरी नाही मिळणार; पण हे होऊ शकते की चांगली नोकरी असेल, तर चांगली गर्लफ्रेंड नक्की मिळेल. युवकांना योग्य दिशेने प्रेरणा देणे हाच माझा हेतू आहे. वाचन ही एक सकारात्मक गोष्ट आहे, जे आपली एकाग्रता वाढवते. लोकांना मोबाईलची सवय लागली आहे, जी सवय चांगली नाही. त्यांनी सोशम मीडियाचा वेळ कमी करून तो वाचनासाठी दिला पाहिजे, असेही भगत म्हणाले.

चेतन भगतचे युवकांसाठी उपलब्ध साहित्य

चेतन भगत यांची 'फाइव्ह पॉइंट समवन' ही पहिली काबंदरी कमालीची गाजली. ज्यावर नंतर थ्री इडीयट्स हा सिनेमा निघाला. त्यांची 'वन नाईट ॲट कॉल सेंटर' ही कादंबरी गुडगाव येथील एका कॉल सेंटर वर आधारित आहे. आजही अनेक पुस्तक विक्री दुकानांमध्ये त्यांच्या या दोन्ही कादंबर्‍या विक्रीचे उच्चांक मोडताना दिसतात. 'गर्ल इन रूम १०५' ही एक त्यांची प्रेम कथा कादंबरी सुवर्ण अभ्यंकर यांनी मराठीत अनुवाद केलेली आहे. 2008 मध्ये त्यांनी 'थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ' ही कादंबरी लिहिली. टू स्टेट्स 2010 मध्ये प्रकाशित केलेली त्यांची कादंबरी उत्तर आणि दक्षिणमध्ये होणाऱ्या विवाह परिस्थितीवर आधारित कादंबरी आहे. या कादंबरीवर ही टू स्टेट्स नावाचा सिनेमा निघालेला आहे. 'रिव्होल्यूशन,' 'हाफ गर्लफ्रेंड', 'व्हॉट यंग इंडिया वॉन्ट' या सुद्धा भगत यांच्या काही कादंबऱ्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news