The Great Indian Family : मानुषीचा हा चित्रपट ‘या’ दिवशी रिलीज होणार

मानुषी छिल्लर
मानुषी छिल्लर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री मानुषी छिल्लर तिच्या जबरदस्त आणि प्रतिभावान अभिनयासाठी ओळखली जाते. (The Great Indian Family) बॉलीवूड मध्ये तिने स्वतःच अनोखं स्थान निर्माण केलं आहे. आजवर अनेक अफलातून प्रोजेक्ट्सदेखील तिने केले आहेत. पृथ्वीराजमधील तिच्या उल्लेखनीय पदार्पणानंतर आता ती विकी कौशल, मनोज पाहवा आणि कुमुद मिश्रा या कलाकारांच्या सोबतीने "द ग्रेट इंडियन फॅमिली"मध्ये रुपेरी पडद्यावर पुन्हा पुनरागमन करण्यास सज्ज झाली आहे. (The Great Indian Family)

द ग्रेट इंडियन फॅमिली हा एक चित्रपट भावनांचा रोलर-कोस्टर राईड असल्याच कळतंय. मानुषी छिल्लर एका सशक्त स्त्रीची भूमिका साकारताना बघायला मिळणार असून जिचा प्रवास विकीच्या पात्राला आधार देणारा आधारस्तंभ म्हणून उलगडणार आहे. प्रेक्षक त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री बघण्यासाठी उत्सुक आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय कृष्ण आचार्य यांनी केले आहे आणि यशराज फिल्म्स या बॅनरची निर्मिती केलीय. प्रीतमने या चित्रपटाला संगीत दिले आहे.

ट्रेलरमधून मानुषी छिल्लरच्या करिष्माने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले आहेत. पण आता सगळेच हा चित्रपट मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी उत्सुक आहेत. मानुषीच्या तेजस्वी मोहकतेसह " द ग्रेट इंडियन फॅमिली " एक अनोखा चित्रपट असणार यात शंका नाही. मानुषी छिल्लरचे बॉलीवूडमधील काम बघता येणाऱ्या चित्रपटात ती नक्कीच पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची जादू दाखवणार आहे. द ग्रेट इंडियन फॅमिली २२ सप्टेंबर रोजी रिलीज होणार असून एक उत्तम चित्रपट सगळ्यांना अनुभवयाला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yash Raj Films (@yrf)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news