Sholay Fame Satinder Kumar: किती संपत्ती सोडून गेले सतिंदर कुमार? | पुढारी

Sholay Fame Satinder Kumar: किती संपत्ती सोडून गेले सतिंदर कुमार?

पुढारी ऑनलाईन डेस्क : बीरबल नावाने प्रसिद्ध अभिनेते सतिंदर कुमार खोसला यांचे मंगळवारी संध्याकाळी निधन झाले. सतिंदर यांना त्यांच्या कॉमिक भूमिकांसाठी ओळखले जाते. त्यांनी उपकार, रोटी कपडा और मकान, क्रांतीसह अभिनेते मनोज कुमार यांच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. (Sholay Fame Satinder Kumar) सतिंदर कुमार खोसला ८४ वर्षांचे होते. त्यांचे मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात निधन झाले. १९३८ मध्ये पंजाबमधील गुरदासपूरमध्ये जन्मलेले सतिंदर कुमार खोसला यांनी ५०० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. अनेक चित्रपटांमध्ये कॉमेडी भूमिका पार पाडल्या. हिंदी शिवाय मराठी, पंजाबी, भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं. (Sholay Fame Satinder Kumar)

सतिंदर कुमार खोसला मुंबईतील सेवेन बंगलो परिसरामध्ये राहत होते. त्यांच्या परिवारात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

खोसला यांना त्यांचा पहिली यशस्वी भूमिका व्ही शांताराम यांच्या चित्रपटात मिळाली. तो चित्रपट ‘बूंद जो बन गई मोती’ (१९६७) होता. जितेंद्र आणि मुमताज मुख्य भूमिकेत होते. अनेक चित्रपट केल्यानंतर त्यांना ब्लॉकबस्टर चित्रपट शोलेमध्ये एका बंदिवानाची भूमिका मिळाली, जी सर्वात महत्त्वाची प्रमुख भूमिकांपैकी एक होती. शोलेतून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. पुढे ‘अनुरोध’ मध्ये त्यांनी एक ड्रग एडिक्टच्या भूमिका केली, जी हिट झाली. त्यांनी ‘मेरा नाम जोकर’, ‘अमर प्रेम’, ‘आराधना’, ‘गॅम्बलर’, ‘सदमा’, ‘याराना’ आणि ‘मिस्टर एंड मिसेज खिलाडी’, ‘बोल राधा बोल’, ‘बेताब’, ‘कर्ज’ या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या.

किती संपत्ती सोडून गेले सतिंदर कुमार खोसला

सतिंदर कुमार यांची एकूण संपत्ती ८३ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. सतिंदर कुमार खोसला यांच्या निधनानंतर सिने अँड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशन (CINTAA) ने सोशल मीडियावर या वृत्ताची पुष्टी करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले होते. “CINTAA बीरबल (१९८१ चे सदस्य) यांच्या निधनानर शोक व्यक्त करतो.”

Back to top button