Vertical Drilling : उत्तरकाशी – ऑगर मशीनमध्ये पुन्हा बिघाड, ४१ कामगारांच्या बचावासाठी आता व्हर्टिकल ड्रिलिंगचा पर्याय?

Vertical Drilling
Vertical Drilling
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तरकाशीतील सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. दरम्यान उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी लवकरच या कामगारांचा बाहेर काढले जाईल असे स्पष्ट केले होते. दरम्यान बचावकार्यातील अधिकारी व्हर्टिकल ड्रिलिंगच्या पर्यायावर विचार करत असून, त्याबाबत लवकरच निर्णय होण्याची अपेक्षा आहे, असे वृत्त 'इंडिया टुडे' ने दिले आहे. (Vertical Drilling)

अमेरिकन-ऑगर मशीन मेटल गर्डरला आदळल्यानंतर शुक्रवारी (दि.२४) सकाळी उत्तरकाशी बचाव कार्य दुपारपर्यंत स्थगित करण्यात आले. त्यानंतर अनेक तासांच्या तांत्रिक बिघाडानंतर ड्रिलिंग मशीन दुरूस्त करून शुक्रवारी संध्याकाळी बचावकार्य पुन्हा सुरू झाले. मात्र शुक्रवारी संध्याकाळी हे ड्रिलिंग मशीन पुन्हा आदळले. उत्तरकाशी बोगद्याच्या बचाव मोहिमेतील आतापर्यंत या सर्वात मोठ्या अडथळ्याचा सामना करावा लागला. परिणामी ड्रिलिंग थांबले आणि त्यानंतर ऑपरेशन स्थगित करण्यात आले. त्यानंतर ड्रिलिंग मशीन येताच व्हर्टिकल ड्रिलिंगचे काम सुरू होईल. तसेच अधिकारी व्हर्टिकल ड्रिलिंगच्या पर्यायावर विचार करत असून, त्याबाबत लवकरच निर्णय होण्याची अपेक्षा आहे, असेही वृत्तात म्हटले आहे. (Vertical Drilling)

बचाव कार्यात सहभागी असलेल्या सरकारी यंत्रणांनी व्हर्टिकल ड्रिलिंगची तयारी सुरू केली आहे. ड्रिलिंगसाठी वापरले जाणारे मशीन पूर्णपणे स्थापित केले गेले आहे आणि ते बसविण्यास तयार आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) ने उभ्या ड्रिलिंग साइटवर जाण्यासाठी आधीच रस्ता तयार केला आहे आणि लवकरच प्लॅटफॉर्म मजबूत करण्यासाठी मालाची वाहतूक केली जाईल. दरम्यान महिलांसह पुरूष मजूर टेकडीच्या माथ्यावर जाऊन उभ्या ड्रिलिंगसाठी खोदकाम सुरू करताना दिसत आहेत. हा कामासाठी सुमारे २० मजुरांना काम देण्यात आले आहे, असे देखील इंडिया टुडे ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. (Vertical Drilling)

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news