वाराणसी : तब्बल १२६ वर्षीय शिवानंद बाबांना पद्मश्री पुरस्कार, कशी आहे त्यांची दिनचर्या ?

126 वर्षांचे बाबा शिवानंद
126 वर्षांचे बाबा शिवानंद
Published on
Updated on

वाराणसी : पुढारी ऑनलाईन : देशात प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये ४ पद्मविभूषण, १७ पद्मभूषण आणि ११७ जणांना पद्मश्री देण्यात आला. यामध्ये वाराणसीमधील कबीरनगर येथे राहणारे शिवानंद बाबा यांना पद्मश्री जाहीर करण्यात आला. त्यांचे वय १२६ वर्षे असून ते तंदुरूस्‍त आहेत.

आधारकार्ड आणि पासपोर्टवर त्‍यांची जन्म तारीख ८ ऑगस्‍ट १८९६ अशी आहे. यानुसार ते जगातील सर्वांत वयस्‍कर आहेत. ते इतक्या वयाचे असूनही त्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली नाही. सर्वांधिक वर्ष जगण्याचा विक्रम चित्तेसु वतनबे यांच्या नावे आहे.

शिवानंद बाबांनी सांगितले की, ते फक्‍त शिजवलेले अन्न सेवन करतात. ते दूध, फळ याचे सेवन करत नाहीत. ते दररोज पहाटे 3 वाजता उठून योगा करतात. त्‍यानंतर ते पूजा पाठ करून आपल्‍या दिवसाची सुरूवात करतात. यामूळे ते 126 वर्षे जगले आहेत आणि तंदुस्‍त आहेत.

बाबांना पद्मश्री पुरस्कार पद्मश्री पुरस्कार मिळाल्याने त्यांना खूप आनंद झाला आहे. त्यांनी भारत सरकारचे आभार मानले. शिवानंद बाबा म्हणतात की जीवन सामान्य पद्धतीने जगले पाहिजे. त्याचवेळी बाबांचे वैद्य डॉक्टर एस.के. अग्रवाल यांनी सांगितले की, बाबा सात्विक अन्न खातात आणि पूर्ण शिस्तीने जीवन जगतात. त्यांच्या आयुष्यात योगा महत्त्वाचा आहे.

तसेच, या वयात बाबांचा फिटनेस आणि कठीण योगासने करण्याचे कौशल्य तेव्हा चर्चेत आले जेव्हा बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने त्यांचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला. बाबांनी सर्वांना आपल्या तब्येतीची माहिती दिली. यातून प्रेरणा घेऊन शिल्पाने योगा करायला सुरुवात केली.

हे ही वाचलं का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news