सायरस पुनावाला यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर होताच आदर पुनावाला भावनिक - पुढारी

सायरस पुनावाला यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर होताच आदर पुनावाला भावनिक

पुणे : पुढारी वृत्तसेवा

‘माझा मेंटर, माझा हिरो व माझे वडील सायरस पुनावाला यांची दखल भारत सरकारने घेतल्याबद्दल त्यांचे आभार’ असे भावनात्मक ट्वीट करत सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी वडील सायरस पुनावाला यांच्याप्रती भावना व्यक्त केल्या आहेत. सोबत त्यांनी त्यांचा लहानपनाचा वडील सायरस पुनावाला, आई विलू पुनावाला यांच्यासोबतचा फोटोही शेअर केला आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारने पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्म विभूषण विजेत्यांची नावे जाहीर केली. त्यामध्ये सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक सायरस पुनावाला यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर काही वेळातच आदर पुनावाला यांनी हे ट्विट केले. या ट्विटला हजारो नेटकरी लाईक आणि कमेंट करत आहेत.

हे ट्विट करताना आदर पुनावाला यांनी सुरवातीला सर्व पद्म पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आहे त्यानंतर वडिलांचा उल्लेख ‘हिरो’ ‘मेंटर’ असा केला आहे.

Back to top button