पद्म पुरस्कारांवर उत्तर प्रदेशची मोठी छाप ! २ मरणोत्तर पद्मविभूषण, २ पद्मभूषण, ९ जणांना पद्मश्री | पुढारी

पद्म पुरस्कारांवर उत्तर प्रदेशची मोठी छाप ! २ मरणोत्तर पद्मविभूषण, २ पद्मभूषण, ९ जणांना पद्मश्री

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी चौघांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 17 जणांना पद्मभूषण आणि 107 जणांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये, देशाने पहिले सीडीएस बिपिन रावत यांना गमावले. हेलिकॉप्टर अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी सरकारकडून त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्याशिवाय, यावेळी सरकार यूपीचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते कल्याण सिंह यांना पद्मविभूषण देऊन मरणोत्तर सन्मानित करणार आहे. त्यांचेही गेल्या वर्षी प्रकृती अस्वास्थ्यामुळे निधन झाले.

यावेळी सरकारने लस उत्पादकांचाही सन्मान केला गेला आहे. सायरस पूनावाला, कृष्णा एला आणि सुचरिता एला यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य आणि अभिनेते विनय बॅनर्जी यांनाही पद्मविभूषण प्रदान करण्यात येणार आहे.

पद्म पुरस्कारांमध्येही निवडणुकीची जोड दिसून येत आहे. यावेळी यूपीमधील 13, उत्तराखंडमधील 4, पंजाबमधील 4, गोव्यातील 2 आणि मणिपूरमधील 3 व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या वेळी अनेक खेळाडूंना सन्मानित करून प्रोत्साहनही देण्यात आले आहे. एकूण 9 खेळाडूंना पद्मश्रीने सन्मानित करण्यात येत आहे. देवेंद्र झाझारिया यांना पद्मभूषण प्रदान करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील सात जणांना ‘पद्मश्री’

मेडिसिन क्षेत्रातील उत्कृष्ठ कामगिरी साठी डॉ.हिंमतराव बावस्कर आणि डॉ.विजयकुमार विनायक डोंगरे यांना, तर सुलोचना चव्हाण यांना कलाक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीकरीत पद्मश्री पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. गायक सोनू निगम यांना कलाक्षेत्रातल उत्कृष्ठ योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अनिल कुमार राजवंशी यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने स्नमानित करण्यात आले. शिवाय मेडिसिन क्षेत्रातील उत्कृष्ठ योगदानाबद्दल डॉ.भीमसेन सिंगल तसेच डॉ.बालाजी तांबे मरणोत्तर यांना पद्मश्री पुरस्कार जाहिर करण्यात आले आहे.

हे ही वाचलं का ?

Back to top button