वाजवायची सानकन : अवधूत गुप्तेचं सर्किटमधील अॅक्शनपॅक्ड गाणं लॉन्च

वाजवायची सानकन गाणं
वाजवायची सानकन गाणं
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : हाय व्होल्टेज ड्रामा असलेल्या 'सर्किट' या चित्रपटातलं "वाजवायची सानकन ' हे गाणं लाँच करण्यात आलं आहे. रॅप शैलीचं हे गाणं सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांनी गायलं आहे. मंगेश कांगणे यांनी हे गाणे लिहिले आहे. "सर्किट" हा चित्रपट ७ एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

भांडारकर एंटरटेन्मेंट आणि पराग मेहता प्रस्तुत सर्किट या चित्रपटाची निर्मिती मधुर भांडारकर, फिनिक्स प्रॉडक्शनच्या पराग मेहता, अमित डोगरा आणि देवी सातेरी प्रॉडक्शनच्या प्रभाकर परब यांनी केली आहे. स्वरूप स्टुडिओचे सचिन नारकर, विकास पवार तर फिनिक्स प्रॉडक्शनचे अल्पेश गेहलोत, कीर्ति पेंढारकर, आकाश त्रिवेदी, मनोज जैन, मोहित लालवाणी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

आकाश पेंढारकर यांनी या चित्रपटातून आपले दिग्दर्शकीय पदार्पण केलं आहे. तर अभिजीत कवठाळकर यांचं श्रवणीय संगीत या चित्रपटाला लाभलं आहे. संजय जमखंडी यांनी रुपांतरित कथा आणि संवाद लेखन, शब्बीर नाईक यांनी छायांकन, तर अतुल साळवे यांनी कार्यकारी निर्माता म्हणून जबाबदारी निभावलीय. चित्रपटात वैभव तत्त्ववादी, हृता दुर्गुळे, रमेश परदेशी, मिलिंद शिंदे अशी तगडी स्टारकास्ट आहे.

पटकन संतापणाऱ्या तरुणाची गोष्ट 'सर्किट' या चित्रपटात मांडण्यात आली आहे. त्यामुऴे या भूमिकेला साजेसं असं 'वाजवायची सानकन' हे गाणं लक्षवेधी ठरत आहे. आनंद पेंढारकर, जितेंद्र जोशी यांनी गीतलेखन केलेल्या आणि सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या सुमधुर आवाजातील "काहीसा बावरतो, काहीसा सावरतो' या रोमँटिक गाण्याला प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news