Vaishali Takkar: वैशालीच्या आईचे गंभीर आरोप, राहुलला म्हटले ‘डर’मधील शाहरुख खान

Vaishali Takkar
Vaishali Takkar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्हीची प्रसिद्ध अदाकारा वैशाली ठक्करने रविवारी आपले जीवन संपवले. तिच्या मृत्यूशी संबंधित अनेक रहस्य उघड होत आहेत. वैशालीच्या चिठ्ठीत या गोष्टीचा खुलासा झाला आहे की, ती तिचा एक्स बॉयफ्रेंड राहुल नवलानीच्या छळाला कंटाळली होती. (Vaishali Takkar) वैशाली ठक्कर केसनंतर इंदौर पोलिसदेखील ॲक्टिव्ह झाले आहेत. पोलिस वैशालीचा एक्स बॉयफ्रेंड राहुल नवलानी, पत्नी दिशा आणि त्याच्या कुटुंबीयाविरोधात लुकआउट नोटिस जारी करणार आहे. (Vaishali Takkar)

इंदौर पोलिस कमिश्नरचे म्हणणे आहे की, राहुल आपल्या परिवारासोबत देश सोडण्याच्या तयारीत आहे. राहुलची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. तो देश सोडून पळू शकतो. इंदौर पोलिस कमिश्नरने या प्रकरणी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, या प्रकरणी ते अनेक इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची चौकशी करत आहेत. वैशाली ठक्कर प्रकरणात आणखी एक नाव समोर आले आहे. रोहित हा राहुलच्या पत्नीचा भाऊ आहे.

वैशालीची आई म्हणाली-

राहुलविषयी वैशालीची आई म्हणाली- राहुल हा डर चित्रपटातील शाहरुख खानने साकारलेल्या पात्रासारखा आहे. बाहेरून दिसायला एकदम स्वीट आणि आतून तितकाच धोकादायक. राहुलमुळेच वैशालीचा जीव गेलाय. वैशालीच्या आईचे म्हणणे आहे की, आरोपींना कडक शिक्षा व्हावी. त्यांनी राहुलवर अनेक गंभीर आरोप केले. पोलिसांनी राहुल आणि त्याच्या पत्नी विरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याची तक्रार नोंद केलीय.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news