नवी दिल्ली; वृत्तसंस्था : उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या मजुरांसाठीच्या बचावकार्याला आलेल्या यशाची दखल जगभरातील माध्यमांनी घेतली.
बीबीसी : भारतीय बचाव पथकांचे हे मोठे यश आहे. मजुरांना बाहेर काढण्यासाठी बोगद्यात एक लहान बोगदा तयार करणे ही खरोखर एक किमया होती. दोरी बांधलेले स्ट्रेचर आतमध्ये गेले. मजूर स्ट्रेचरवर आडवे झाले आणि बचाव पथकाने एकेक करून त्यांना बाहेर काढले. हे अद्भुत होते.
द डॉन (पाकिस्तान) : ही एक अत्यंत जटिल अशी बचाव मोहीम होती. भारताने ती फत्ते केली.
सीएनएन (अमेरिका) : शेवटच्या क्षणात रॅट मायनर्स मजुरांनी हाताने ड्रिलिंग करून मोठे योगदान दिले.
अल जजिरा (कतार) : मोदी सरकारच्या चारधाम मार्ग प्रकल्पाचा एक भाग असलेल्या या बोगद्यातील बचावकार्य एक थरारपटच होता.
द गार्जियन (ब्रिटन), साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट (हाँगकाँग), डीडब्ल्यू (जर्मनी), रॉयटर्स (ब्रिटन), न्यूयॉर्क टाईम्स (अमेरिका), काठमांडू पोस्ट (नेपाळ) आदी दैनिकांनीही ठळकपणे या मोहिमेच्या यशाची दखल घेतली आहे.
हेही वाचा :