Uttara Baokar passes away | अभिनेत्री उत्तरा बावकर काळाच्या पडद्याआड, ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Uttara Baokar passes away | अभिनेत्री उत्तरा बावकर काळाच्या पडद्याआड, ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुढारी ऑनलाईन : प्रसिद्ध अभिनेत्री उत्तरा बावकर यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्या दीर्घ आजाराने त्रस्त होत्या. अखेर मंगळवारी (दि.१३) त्यांनी रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्यावर पुण्यात बुधवारी (दि.१३) अंत्यसंस्कार करण्यात आले, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. (Uttara Baokar passes away)

अभिनेत्री उत्तरा यांनी आत्तापर्यंत अनेक मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांनी १९८६ मध्ये 'यात्रा' या मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर १९८७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'तमस' या मालिकेतून त्या प्रकाशझोतात आल्या. त्यांनी सुमित्रा भावे यांच्यासोबत अनेक चित्रपटात काम केले आहे.

अभिनेत्री उत्तरा बावकर यांनी दोघी, वास्तूपुरुष, उत्तरायण, शेवरी, रेस्टोरेंट यांसारख्या मराठी चित्रपटात काम केले आहे. दरम्यान त्यांनी 'एक दिन अचानक', 'रुक्मावती की हवेली', 'द बर्निंग सीजन', 'सरदारी बेगम' यांसारख्या हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news