कोल्हापूर -राजाराम कारखाना निवडणूक : महाडिक-पाटील गटांत दुरंगी सामना | पुढारी

कोल्हापूर -राजाराम कारखाना निवडणूक : महाडिक-पाटील गटांत दुरंगी सामना

कसबा बावडा; पुढारी वृत्तसेवा :  संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आ. महादेवराव महाडिक व आ. सतेज पाटील असा पुन्हा एकदा सामना रंगणार असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी 58 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे निवडणूक रिंगणात सत्ताधारी व विरोधी आघाडीच्या 42 उमेदवारांसह दोन अपक्ष असे 44 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. गुरुवारी (दि. 13) सकाळी 11 वाजता चिन्ह वाटप होेणार आहे.

काही अपवाद वगळता सत्ताधारी व विरोधी आघाडीचे एकास एक उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे या निवडणुकीत दुरंगी लढत होणार आहे. दरम्यान, महाडिक यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ छत्रपती राजर्षी शाहू आघाडीने दुपारी साडेबाराच्या सुमारास आपल्या पॅनेलचे उमेदवार जाहीर केले. आ. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीने दुपारी दोनच्या सुमारास आपलेे उमेदवार जाहीर
केले.

कारखान्याच्या या निवडणुकीत सत्ताधारी गटाने ऊस उत्पादक गटात 1 आणि महिला गट 2 अशी तीन महिलांना पॅनेलमध्ये संधी दिली आहे. विरोधी परिवर्तन आघाडीने ऊस उत्पादक गट 2 व महिला गट 2 अशा 4 महिलांना पॅनेलमध्ये संधी दिली आहे.

छत्रपती राजर्षी शाहू सहकार आघाडीचे गटनिहाय उमेदवार असे : उत्पादक गट क्रमांक 1 – 1) विजय वसंत भोसले (रुकडी), 2) संजय बाळगोंडा मगदूम (रुई). उत्पादक गट क्रमांक 2 – 1) शिवाजी रामा पाटील (लाटवडे), 2) सर्जेराव बाबुराव भंडारे (नरंदे), 3) अमल महादेवराव महाडिक (पेठ वडगाव). उत्पादक गट क्रमांक 3 – 1) विलास यशवंत जाधव (शिये), 2) डॉ. मारुती भाऊसो किडगावकर (निगवे दु.), 3) सर्जेराव कृष्णात पाटील-बोणे (वडणगे). उत्पादक गट क्रमांक 4 – 1) तानाजी कृष्णात पाटील (गडमुडशिंगी), 2) दिलीपराव भगवान पाटील (शिरोली पु.), 3) मीनाक्षी भास्कर पाटील (वाशी). उत्पादक गट क्रमांक 5 – 1) दिलीप यशवंत उलपे, 2) नारायण बाळकृष्ण चव्हाण (दोन्ही कसबा बावडा). उत्पादक गट क्रमांक 6 – 1) गोविंद दादू चौगले – (सोन्याची शिरोली), 2) विश्वास सदाशिव बिडकर (धामोड). महिला राखीव गट – 1) कल्पना भगवानराव पाटील (टोप), 2) वैष्णवी राजेश नाईक – (कांडगाव). इतर मागास प्रतिनिधी गट – संतोष बाबुराव पाटील (यवलूज). अनुसूचित जाती-जमाती गट – नंदकुमार बाबुराव भोपळे (चोकाक). भटक्या विमुक्त जाती जमाती गट – सुरेश देवाप्पा तानगे (कुंभोज). संस्था गट – महादेवराव रामचंद्र महाडिक – (शिरोली पुलाची). विरोधी राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीचे गटनिहाय उमेदवार असे : उत्पादक गट क्रमांक 1 – 1) शासन बाबुराव बेनाडे (रुई) 2) किरण बाबासाहेब भोसले (रुकडी).

उत्पादक गट क्रमांक 2 – 1) शिवाजी ज्ञानू किबिले (कुंभोज), 2) दिलीप गणपतराव पाटील (टोप), 3) अभिजित सर्जेराव माने (भेंडवडे). उत्पादक गट क्रमांक 3 – 1) बळवंत रामचंद्र गायकवाड (आळवे), 2) विलास शंकर पाटील (भुये), 3) विठ्ठल हिंदुराव माने (वडणगे). उत्पादक गट क्रमांक 4 – 1) दिनकर भिवा पाटील, 2) सुरेश भिवा पाटील, 3) संभाजी शंकरराव पाटील (तिन्ही वाशी). उत्पादक गट क्रमांक 5 – 1) मोहन रामचंद्र सालपे, 2) विजयमाला विश्वास नेजदार-माने (दोन्ही कसबा बावडा).

उत्पादक गट क्रमांक 6 – 1) दगडू मारुती चौगले (धामोड), 2) शांताराम पांडुरंग पाटील (सावर्धन). महिला राखीव – 1) निर्मला जयवंत पाटील (निगवे दु.), 2) पुतळाबाई मारुती मगदूम (कांडगाव). इतर मागास प्रतिनिधी – मानसिंगराव दत्तू खोत (नरंदे), अनुसूचित जाती-जमाती – बाबासाहेब थळोजी देशमुख (शिरोली पुलाची). भटक्या विमुक्त जाती-जमाती – अण्णा विठू रामाण्णा-धनगर (पट्टणकोडोली). संस्था गट – सचिन नरसगोंडा पाटील (वसगडे). याशिवाय उत्पादक गट क्रमांक 5 – विजय रामकृष्ण चव्हाण (कसबा बावडा) व अनुसूचित जाती-जमाती गट – दिगंबर लिंगाप्पा पोळ. या दोन अपक्ष उमेदवारांचे अर्ज कायम आहेत.

दरम्यान, परिवर्तन आघाडीच्या वतीने बुधवारी निवडणूक निर्णय अधिकारी यांना नव्याने अर्ज सादर करण्यात आला. यामध्ये जून 2022 चे प्राधिकरणाचे परिपत्रक, त्याचबरोबर 29 मार्च 2023 रोजी आमच्या आघाडीच्या वतीने निवडणुकीसाठी चिन्ह मागणीकरीता केलेला प्राधान्यक्रमाचा अर्ज, यामधील 30 टक्के उमेदवार आमच्या परिवर्तन आघाडीच्या विद्यमान पॅनेलमध्ये आहेत. त्यामुळे ‘कपबशी’ चिन्ह आमच्या परिवर्तन पॅनेलला प्राधान्याने मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

दोन्ही आघाड्यांकडून नवीन उमेदवारांना संधी

कारखान्याच्या या निवडणुकीमध्ये माजी आ. महादेवराव महाडिक, माजी आ. अमल महाडिक व विद्यमान चेअरमन दिलीप पाटील, दिलीप उलपे या जुन्या चार चेहर्‍यांना वगळता तब्बल 17 नवीन उमेदवारांना सत्ताधारी आघाडीच्या पॅनेलमध्ये संधी दिली आहे, तर 29 उमेदवारांच्या अपात्रतेनंतर परिवर्तन आघाडीच्या पॅनेलमध्ये 18 नवीन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.

Back to top button