धनबाद, पुढारी ऑनलाईन : uttam anand dhanbad : येथील एका हायप्रोफाइल खटल्याची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांचा अपघाती मृत्यू झाला आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर हा अपघाती मृत्यू नसून त्यांना जाणीवपूर्वक धडक दिल्याचे समोर आले आहे.
बुधवारी सकाळी ही घटना घडली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये रिक्षाने धडक दिल्याचे समोर आले आहे.
अपघातात मृत्यूमुखी पडलेले न्यायमूर्ती उत्तम आनंद uttam anand dhanbad हे माजी आमदाराच्या जवळचा असलेल्या रंजय हत्याकांडाची सुनावणी करत होते.
त्यांच्या मृत्यूमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी यात लक्ष घातले असून आरोपींनी लवकरच जेरबंद केले जाईल.
दरम्यान, धनबादच्या स्थानिक आमदाराने याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
धनबादच्या जिल्हा सत्र न्यायालयातील न्यायाधीश उत्तम आनंद बुधवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते.
शहरातील रणधीर वर्मा चौकाजवळ एका रिक्षाने पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सुरुवातीला हा अपघात वाटला होता.
पण सीसीटीव्ही फुटेज तपासली असता धक्कादायक प्रकार समोर आला. रस्त्यावरून सरळ जाणारी रिक्षा मुद्दाम वळवून रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या आनंद यांना धडक दिली.
हेही वाचा