Facebook डाउन! न्यूज फीडमध्ये दिसू लागल्या विचित्र पोस्ट्स

Facebook
Facebook

पुढारी डेस्क : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक (Facebook) आज बुधवारी (दि. २४) डाउन झाले. फेसबुक यूजर्संनी त्यांच्या पेजवर काही विचित्र त्रुटी पाहिल्या. DownDetector.com.au या वेबसाइट ट्रॅकरने या आउटेजची नोंद केली आहे. या वेबसाइटनुसार, सोशल मीडिया अॅपचे यूजर्स त्यांच्या फीडसह समस्या नोंदवत आहेत. त्यांचे मुख्य न्यूज फीड लेडी गागा, निर्वाणा आणि बीटल्स सारख्या सेलिब्रिटींच्या पेजीसवर पाठवलेल्या किरकोळ पोस्टने भरलेले दिसत आहे.

४३ टक्के Facebook यूजर्संनी अॅपबाबत त्रुटी नोंदवल्या आहेत. तर ४० टक्के न्यूजफीडशी संबंधित आहेत आणि १६ टक्के सर्वसाधारणपणे वेबसाइटशी संबंधित आहेत. फेसबुकने अद्याप वेबसाइटसह कोणत्याही आउटेज किंवा समस्येची पुष्टी केलेली नाही. तसेच ते हॅक झाल्याचे स्पष्ट केलेले नाही.

फेसबुकवर काहीतरी घोळ झाल्याचा प्रकार भारतीय यूजर्संना दुपारी १२ च्या सुमारास दिसून आला. त्यानंतर यूजर्संनी ट्विटरवर तक्रारी नोंदवल्या. अनेक यूजर्संना हे लक्षात घेतले आहे की त्यांचे Facebook फीड केवळ त्यांच्याशी संबंधित अथवा त्यांच्या आवडीच्या नसलेल्या पोस्ट दाखवत आहे. यूजर्संना सेलिब्रिटींना त्यांच्या फीडवर दिसणाऱ्या डझनभर random posts दिसून आल्या. यातील पेजीस त्यांनी कधीही फॉलो केलेली नव्हती.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news