नाशिक : पतीचे फेसबुक हॅक करत केली 45 लाखांच्या खंडणीची मागणी | पुढारी

नाशिक : पतीचे फेसबुक हॅक करत केली 45 लाखांच्या खंडणीची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पतीचे फेसबुक खाते हॅक करून त्यावरील फोटो चोरून ते मित्रांना, नातलगांना पाठवण्याची धमकी देत पत्नी व सासर्‍याने एकाकडे 45 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी युवकाने अंबड पोलिस ठाण्यात त्याच्या पत्नीसह सासरा व फेसबुक खाते हॅक करणार्‍याविरोधात खंडणीची फिर्याद दाखल केली.

विनोद अंकुश इरशेट्टी (35, रा. महाराणाप्रताप चौक, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार संशयितांनी मार्च ते एप्रिल 2022 दरम्यान खंडणीची मागणी केली. पत्नी माधुरी ऊर्फ ज्योती रमेश सोनवणे ऊर्फ माधुरा ऊर्फ ज्योती विनोद इरशेट्टी व रमेश सोनवणे (56, दोन्ही रा. पोरबंदर, गुजरात) यांनी फेसबुक खाते हॅक करणार्‍या व्यक्तीसोबत संगनमत करून खंडणी मागितली. फेसबुकवरील विनोद यांचे फोटो चोरून त्यावरून विनोद यांची सामाजिक प्रतिमा मलीन होईल, या हेतूने फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. विनोद यांच्या फेसबुक खात्यावरून त्यांचे मित्र, नातलग, अनोळखी मुलींना अश्लील मेसेज पाठवत शिवीगाळ व धमक्या दिल्या. संशयित रमेश सोनवणे यांनी विनोदकडे 45 लाखांची खंडणी मागितली आणि खंडणीची रक्कम दिली नाही तर कार्यालयात खासगी मेसेज व्हायरल करण्याची धमकीसुध्दा दिली. त्यामुळे विनोद यांनी पोलिसांकडे तक्रार केली. मात्र, पोलिसांनी तक्रारीस टाळाटाळ केल्याने विनोद यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानुसार न्यायालयाच्या आदेशाने अंबड पोलिस ठाण्यात तिघांविरोधात खंडणीसह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

हेही वाचा :

Back to top button