Gun culture in America : अमेरिकेत फेसबुकवरून बंदुकांची खरेदी-विक्री! | पुढारी

Gun culture in America : अमेरिकेत फेसबुकवरून बंदुकांची खरेदी-विक्री!

वॉशिंग्टन ; वृत्तसंस्था : अमेरिकेत ‘गन कल्चर’ला (Gun culture in America) हवा देण्यात सोशल मीडियाची मोठी भूमिका असल्याचे समोर आले आहे. अमेरिकेतील ‘फेसबुक’चे 70 टक्के यूझर्स व्हिडीओ लिंकच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची रिव्हॉल्व्हर, गनल सेमी-ऑटोमॅटिक रायफल अगदी सहज खरेदी करू शकतात.

अमेरिकेत ‘गन कल्चर’वर (Gun culture in America) (बंदूक विकृती) जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ‘गन लॉबी’वर लगाम कसण्याची तयारी सुरू केली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे मात्र बंदूक स्वातंत्र्याच्या बाजूने आहेत. गुंडांपासून स्वसंरक्षणासाठी सभ्य लोकांकडे शस्त्रे हवीच, त्यामुळे अशा लोकांचे परवाने रद्द करू नयेत, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे.

उवाल्डे येथे एका विद्यार्थ्याने बेछूट गोळीबारात दुसरी ते चौथीतील 19 विद्यार्थ्यांची व 2 शिक्षकांची हत्या केल्यानंतर अमेरिकेत बंदुकीची सहज उपलब्धता या समस्येचे मूळ असल्याचे मानले जाऊ लागले आहे. लोक कायदेशीर त्रुटींवर बोट ठेवत आहेत.

‘फेसबुक’ने बंदुकांच्या धंद्यात ‘ई-बे’ आणि ‘क्रॅगसलिस्ट’लाही मागे टाकले आहे. ‘फेसबुक’वरून व्यवहार अत्यंत सोपा आहे. कुठल्याही नोंदीशिवाय विक्रेता आणि ग्राहक आपला व्यवहार पार पाडू शकतात. नियमानुसार फेसबुक वा अन्य कुठल्याही सोशल मीडिया प्लेटफॉर्मवरून बंदुकीसारख्या घातक वस्तूंची खरेदी विक्री करणे बेकायदा आहे. याउपर फेसबुकवर ‘गन केस’ लिहून सर्चिंग केले की फेसबुकच्या अल्गोरिदमवर बंदूक खरेदीचे एकामागे एक पर्याय येऊन पडतात. कमी किमतीत अनेक व्हरायटी उपलब्ध असतात.

फेसबुक स्वत:ही हैराण (Gun culture in America)

फेसबुकने सॉफ्टवेअरमध्ये सुधारणा करण्यासाठी 2016 पासून आतापर्यंत एक हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च केला, पण बंदुकीच्या व्यापारात घट आलेली नाही.

बंदूक विकणार्‍यांना वेगळे करून हटविण्याची कुठलीही तरतूद या घडीला फेसबुककडे नाही. वरून अशा कंटेंटवर कारवाईसाठी कुठली यंत्रणाही नाही.

Back to top button