US Presidential Election : भारतीय वंशाचे ‘रामास्वामी’ अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर

US Presidential Election
US Presidential Election

पुढारी ऑनलाईन डेस्क: अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. यापार्श्वभूमीवर आयोवा राज्यात रिपब्लिकन पक्षाचे पहिले कॉकस आयोजित करण्यात आले होते. यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारली. त्यामुळे भारतीय वंशाचा चेहरा असलेल्या विवेक रामास्वामी यांना अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या शर्यतीतून माघार घ्यावी लागली आहे.

साेमवारी (दि.१५) अमेरिकेतील आयोवा राज्यात रिपब्लिकन पक्षाचे पहिले कॉकस आयोजित करण्यात आले. यामध्‍ये डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले. रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार निवडण्याची प्रक्रिया सुरू करणाऱ्या आयोवा कॉकसमधील मतदानात ट्रम्प आघाडीवर आहेत. भारतीय वंशाचे ३८ वर्षीय रिपब्लिकन नेते रामास्वामी हेही  प्रमुख दावेदार होते, मात्र ट्रम्प यांनी बाजी मारल्याने रामास्वामी हे राष्ट्राध्यपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.

रामास्वामी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा दिला

आयोवा कॉकसमधील विजय आणि रिपब्लिकन पक्षात डोनाल्ड ट्रम्प यांचे वाढते वर्चस्वामुळे त्यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून आपले नाव मागे घेतल्याचे मानले जात आहे. लक्षाधीश माजी बायोटेक एक्झिक्युटिव्ह विवेक रामास्वामी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्षपदासाठी पाठिंबा दिला आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news