Israel Hamas conflict | अमेरिकेचे राष्टाध्यक्ष जो बायडेन इस्रायलमधील तेल अविवमध्ये दाखल

Israel Hamas conflict | अमेरिकेचे राष्टाध्यक्ष जो बायडेन इस्रायलमधील तेल अविवमध्ये दाखल
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : इस्रायल-हमास युद्धादरम्यान आज अमेरिकेचे राष्टाध्यक्ष जो बायडेन इस्रायलमधील तेल अविव येथे दाखल झाले. बेन गुरियन विमानतळावर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि राष्ट्राध्यक्ष इसाक हरझोग यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी उभय नेत्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली. जो बायडेन यांच्या इस्रायलच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या 

इस्रायल आणि हमास यांच्यात तीव्र संघर्ष सुरु आहे. गाझा येथील अल अहली हॉस्पिटलवर झालेल्या हल्ल्यात सुमारे ५०० लोकांचा मृत्यू झाला आहे. या मोठ्या जीवितहानीमुळे इस्रायलच्या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. इस्रायलला स्वत:ची सुरक्षा करण्याच्या अधिकारासाठी पाठिंबा मिळविण्याच्या अमेरिकेच्या नेतृत्वाखालील राजनैतिक प्रयत्नांना या हल्ल्याने धक्का बसला आहे. अम्मान, जॉर्डन येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि इतर नेत्यांमधील शिखर बैठक रद्द करण्यात आली आहे. आता इस्रायलला पाठिंबा देण्यासाठी बायडेन आज तेल अविवमध्ये दाखल झाले. गाझा येथील हॉस्पिटलमध्ये झालेल्या भीषण स्फोटाला हमास आणि इस्रायल एकमेकांवर आरोप करत आहेत.

इस्त्रायली सैन्याने बुधवारी गाझा शहरातील रहिवाशांना दक्षिणेकडे स्थलांतरित होण्याचे आवाहन केले.

दरम्यान, गाझामधील अल अहली हॉस्पिटलमध्ये झालेल्या जीवितहानीच्या घटनेवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. या घटनेने मोठा धक्का बसला; पीडितांच्या कुटुंबीयांप्रती आम्ही संवेदना व्यक्त करतो आणि जखमी लोक लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो, असे Israel Hamas पीएम मोदी यांनी X वर पोस्ट करत म्हटले आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news