पुढारी ऑनलाईन : भारताने G20 परिषदेचे अध्यक्षपद १ डिसेंबर रोजी स्वीकारले. यानंतर भारताचे पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत जागतिक स्तरावर सर्वसमावेशक, महत्त्वकांक्षी, कृती केंद्रित आणि निर्णायक अजेंड्यावर आधारित कार्य करणार असल्याचे म्हटले होते. मोदी यांच्या ट्विटरवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी देखील भारताकडील G20 अध्यक्षपदाच्या कारकिर्दित माझे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देणार असल्याचे म्हणत प्रतिसाद दिला आहे.
पुढे ज्यो बायडेन यांनी म्हटले आहे की, भारत हा अमेरिकेचा मजबूत भागीदार असणारा देश आहे. त्यामुळे G20 च्या भारताकडील अध्यक्षपदादरम्यान माझे मित्र पंतप्रधान मोदी यांना मी पाठिंबा देण्यासाठी उत्सुक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. हवामान, ऊर्जा आणि अन्न संकट यांसारख्या समस्यांमधील आव्हानांचा आम्ही एकत्रित सामना करू आणि सर्वसमावेशक, शाश्वत विकास वाढीसाठी प्रयत्न करू असे देखील बायडेन यांनी सांगितले आहे.
इंडोनेशिया येथील बाली येथे पार पडलेल्या G20 शिखर परिषेदे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ज्यो बायडन यांच्यातील मैत्रीचे दर्शन घडले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमिरेकचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची पहिलीच भेट घेतली. यावेळी दोन्ही देशांच्या प्रमुखांनी आदराने गळाभेट करत एकमेकांचे हात हातात घेत भेट घेतली. याबाबतचा फोटो पीएमओ कार्यालयाकडून ट्विटरवर शेयर करण्यात आला. दोन्ही देशातील मैत्रीपूर्ण संबंध आणि मैत्री किती घट्ट आहे यावरून अधोरेखित होते.
इंडोनेशिया येथील जी20 परिषदेत दोन्ही नेत्यांची भेट झाल्यानंतर दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसून आले. यापूर्वी देखील दोन्ही नेत्यांची भेट झाल्यानंतर संपूर्ण जगभरात भारत अमेरिका संबंध आणि नरेंद्र मोदी-ज्यो बायडन यांच्या मैत्रीची चर्चा होताना दिसते.
होत असते.