US Firing : अमेरिकेच्या कनसास शहरात गोळीबार; १ ठार, २१ जखमी

US Firing
US Firing
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबार झाला आहे. हा गोळीबार कॅन्सस शहरात झाला आहे. या गोळीबारात एकजण ठार झाला आहे. तर २१ जण जखमी झाले आहेत. तर तीन जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना 'सिटी चीफ्स सुपर बाउल' या क्रीडा स्पर्धेदरम्यान घडली आहे.  अग्निशमन विभागाने सांगितले की, "ही घटना मिसुरीच्या कॅन्सस सिटीमध्ये घडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, युनियन स्टेशनच्या पश्चिमेकडील गॅरेजमधून लोक जात होते तेव्हा गोळीबार झाला. हल्ल्यानंतर पोलिसांनी तीन सशस्त्र लोकांना ताब्यात घेतले आहे. (US Firing)

घटनेबाबत एका महिलेने सांगितले की, "जेव्हा गोळ्यांचा आवाज आला तेव्हा आम्ही तेथून पळ काढला आणि लिफ्टमध्ये लपलो. आम्ही दरवाजे बंद केले. सर्वजण देवाची प्रार्थना करत होते. तिथले सगळेच चिंतेत होते. आम्ही किती सुरक्षित आहे हे आम्हाला माहीत नव्हते. काही वेळाने लिफ्ट हलल्याचा आवाज आला. आम्ही दरवाजे उघडले तेव्हा बाहेर अधिकारी होते. त्यांनी आम्हाला सुखरूप बाहेर काढले. "पोलिसांनी सांगितले, आत अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात येत आहे. कॅन्ससच्या गव्हर्नर लॉरा केली यांनी लोकांना पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

गोळीबारात अटलांटा हायस्कूलचे विद्यार्थीही जखमी

दरम्यान कॅन्ससशिवाय अमेरिकेतील अटलांटा हायस्कूलच्या पार्किंगमध्येही गोळीबार झाला होता, ज्यामध्ये चार मुलांना गोळ्या लागल्या होत्या. अटलांटा पब्लिक स्कूल्सने एक निवेदन जारी केले की बुधवारी (दि.१४) बेंजामिन ई. मेस हायस्कूलमध्ये एका अज्ञात वाहनातून विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्यात आला. जखमी विद्यार्थ्यांची ओळख पटलेली नाही. जखमींना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत त्याची कारणे अद्याप समोर आलेली नाहीत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news