Urfi Javed News : शेवटी हातकड्यांमध्ये…फोटो शेअर करत उर्फीचं खोचक ट्विट

Urfi Javed News : शेवटी हातकड्यांमध्ये…फोटो शेअर करत उर्फीचं खोचक ट्विट
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री, माॅडेल उर्फी जावेद आपल्या हटके फॅशनमूळे नेहमी चर्चेत असते. ती आपल्या अधिकृत सोशल मीडियावर सातत्याने फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. गेले काही दिवस ती पुन्हा चर्चेत आली ती भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी तिच्याबद्दल घेतलेली आक्रमक भूमिका. आज तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. या फोटो आणि व्हिडिओमुळे आणि तिने दिलेल्या कॅप्शनमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगू लागल्या आहेत. (Urfi Javed News)

काय आहे उर्फी जावेद प्रकरण 

गेले काही दिवस भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि उर्फी जावेद (Urfi Javed) यांच्यात वाद सुरु आहे. सोशल मीडियावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. हे सोशल वॉर गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. याची सुरुवात चित्रा वाघ यांनी," शी…ऽऽऽऽ अरे..हे काय चाललयं मुंबईत. रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी ही बाई हिला रोखायला मुंबई पोलिसांकडे IPC/CRPC आहेत की नाही. तात्काळ बेड्या ठोका हिला. एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत तर ही बया अजून विकृती पसरवतीये." असं ट्विट करत केली होती. इथून दोघींमध्ये वादाला सुरुवात झाली. आता यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही उडी घेतली आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी "राज्याला उर्फीमध्ये अडकवून, योगी महाराष्ट्रात येऊन बर्फी घेऊन गेले." असं खोचक ट्विट केले आहे.

शेवटी हातकड्यांमध्ये…

उर्फी जावेदने आपल्या ट्विटर अकाउंटवर "शेवटी हातकड्यांमध्ये" असं लिहीत ब्लॅक हटके असा ड्रेस घातला आहे. त्याचबरोबर इन्स्टाग्रामवरही "तुम्हा सर्वांना खरोखरच मला हँडकफ पाहायचे होते. बरोबर? इच्छा मंजूर केली" असं लिहित व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या या पोस्टमुळे नेटकऱ्यांनी हटके कमेंट्स केल्या आहेत. त्याचबरोबर राजकीय वर्तुळातही चर्चा रंगू लागल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news