UP News : पत्नीची क्षुल्लक चूक; पतीने उचलले टोकाचे पाऊल

UP News : पत्नीची क्षुल्लक चूक; पतीने उचलले टोकाचे पाऊल
Published on
Updated on

लखनौ : दरवाजा लवकर उघडला नाही, या कारणावरून येथील एका उद्योजकाने आपल्या पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे नंतर त्यानेही घराच्या खिडकीतून बाहेर उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. तथापि, शेजाऱ्यांनी त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले आहे.

आदित्य कपूर असे आरोपीचे नाव असून, त्याच्या मृत पत्नीचे नाव शिवानी असे आहे. रात्री साडेबाराच्या सुमारास तो घरी आला आणि त्याने दारावरील बेल वारंवार दाबली. तथापि, पत्नीकडून दार उघडायला विलंब झाला. यामुळे त्याचे माथे भडकले आणि त्याने स्वयंपाकघरातील चाकूने पत्नीवर सपासप वार केले. अतिरिक्त रक्तस्राव झाल्यामुळे पत्नीचा मृत्यू झाला. यानंतर तो घाबरला आणि घराच्या खिडकीतून त्याने बाहेर उडी मारली. त्यामुळे मोठा आवाज झाला. पाठोपाठ शेजारी तेथे आले आणि त्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news