UP News : वृद्धाने जिवंतपणीच घातला ‘तेरावा’! कारण ऐकाल तर हैराण व्‍हाल…

UP News : वृद्धाने जिवंतपणीच घातला ‘तेरावा’! कारण ऐकाल तर हैराण व्‍हाल…

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशमधील एटा जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका वृद्धाने जिवंतपणीच आपले तेरावा घातला. पिंड दान करुन ७०० ग्रामस्थांना जेवणही खावू घातले. या घटनेची परिसरात चर्चा होवू लागली आहे. वृद्धाने यामागचे आश्चर्यकारक कारणही सांगितले आहे. (UP News)

UP News : प्रियजनांकडून कोणतीही आशा नाही. ..

उत्तर प्रदेशमधील एटा जिल्ह्यातील साकित परिसरातील मुन्शीनगर गावात राहणारे ७० वर्षीय हकीम सिंह यांनी आपले अंतिम संस्कार केले, पिंड दान केले आणि ७०० जणांना जेवण खावू घातले आहे. गावातील लोकही बिनदिक्कतपणे या तेराव्या विधी आणि मेजवानीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहीले. शेकडो लोकांना जेवण मिळाले. ब्राह्मणांना पाचारण करून हवन-यज्ञ व तेरावे संस्कार सर्व विधींसह पार पडले. त्यांच्या कुटुंबीयांनीही या मेजवानीला हजेरी लावली होती. जिवंत असताना तेरावी तिथी करण्यामागचे कारण सांगताना या वृद्धाने सांगितले की, त्यांना त्यांच्या प्रियजनांकडून कोणतीही आशा नाही. मृत्यूनंतर तेराव्‍याचा विधी  करणार की नाही याबद्दल, याविषयी नातेवाईकांवरील विश्वास उडाला आहे. त्यामुळे हयात असताना त्यांनी ही सर्व कामे त्यांच्यासमोर करून घेतली, असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

जमीन विकून कार्यक्रमाचे आयाेजन

हकीम सिंह यांनी सांगितले की, त्यांना मुलगा किंवा मुलगी नाही. कुटुंबातील भाऊ-पुतण्यांनी घर आणि जमीन घेतली. त्यांना मारहाण केली. अशा स्थितीत मृत्यूनंतर ते काही करतील याचा भरवसा नाही. गेल्या दोन दिवसात अचानक सकाळी माझी तब्येत बिघडली, तेव्हा मला माझ्यासमोर पंडित आणि परिचितांसाठी मेजवानी आयोजित करावीशी वाटली. सुमारे 700 लोक मेजवानीसाठी ले होते. हकीम सिंह यांनी सांगितले की त्यांनी आपली जमीन विकून कार्यक्रमाचे आयाेजन केले. माणसं समोर मरायला लावून मनावर कुठलंही ओझं ठेवायचं नाही. मेजवानीचा आनंद सर्वांनाच असतो. हकीम सिंह यांना लग्नाला बराच काळ लोटल्यानंतरही मूल झाले नाही. यानंतर त्याची पत्नीही त्यांना सोडून गेली. तेव्हापासून ते साधूबाबा म्हणून आयुष्य जगत आहेत. मात्र आता नातेवाईकांवरील विश्वास उडाल्‍याने त्‍यांनी  जिवंतपणीच आपले तेरावा घातल्‍याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news