UP Election 2022: बसपाने ६७ लाख घेवूनही उमेदवारी नाकारल्‍याचा अर्शद राणा यांचा आरोप (व्‍हिडीओ व्‍हायरल )

अर्शद राणा धाय माकलून रडतानाचा व्‍हिडीओ उत्तर प्रदेशमध्‍ये चर्चेचा विषय ठरला आहे.
अर्शद राणा धाय माकलून रडतानाचा व्‍हिडीओ उत्तर प्रदेशमध्‍ये चर्चेचा विषय ठरला आहे.

लखनौ : पुढारी ऑनलाईन
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची ( UP Election 2022 )  रणधुमाळी सुरु झाली आहे. प्रस्‍थापित राजकीय पक्षाची उमेदवारी मिळविण्‍यासाठी मोठीच झुंबड उडाली आहे. सत्ताधारी भाजपसह समाजवादी पार्टी, बहूजन समाज पार्टी, काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळविण्‍यासाठी इच्‍छुकांची धडपड सुरु आहे. अशातच एक व्‍हिडिओ समोर आला आहे. यामध्‍ये बसपाला ६७ लाख रुपये दिली तरीही तिकिट नाकारल्‍यात आल्‍याचा आरोप इच्‍छुक उमेदवाराने केला आहे. अर्शद राणा असे त्‍यांचे नाव आहे.

अर्शद राणा यांनी म्‍हटलं आहे की, बहुजन समाज पार्टीने (बसपा) मला तिकीट देण्‍याचे आश्‍वासन दिले होते. मी मागील काही वर्ष विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करत होतो. आता निवडणुकीची वेळ आल्‍यानंतर बसपाने मला तिकिट नाकारले आहे. बसपाने माझा तमाशा केला आहे.

अर्शद राणा धाय माकलून रडले

विधानसभा निवडणुकीची उमेदवारी नाकारल्‍याचा मोठा मानसिक धक्‍का अर्शद राणा यांना बसला. ते धाय माकलून रडत असल्‍याचा व्‍हिडिओ व्‍हायरल होत असल्‍याने ही बाब समोर आली. या व्‍हिडीओमध्‍ये राणा यांनी आपली खंत व्‍यक्‍त केली आहे. ते म्‍हणाले की, बसपाने माझा तमाशा केला आहे.  मला तिकिट मिळणार हे निश्‍चित होते;पण ऐनवेळा मला सांगण्‍यात आले की, तुमच्‍या जागी आम्‍ही दुसर्‍याला उमेदवारी दिली आहे. मागील काही वर्ष मी विधानसभा निवडणुकीची तयार करत आहे. शहरात ठिकठिकाणी होर्डिंग्‍जही लावली. निवडणुकीसाठी लागणार्‍या सर्व बाबी मी केल्‍या आहेत. तरीही मला तिकिट नाकारण्‍यात आले, असे सांगत अर्शद राणा यांना अश्रू अनावर झाले. ते धाय माकलून रडत असल्‍याचे व्‍हिडीओमध्‍ये दिसत आहे.

UP Election 2022: उमेदवारीसाठी ६७ लाख रुपये घेतल्‍याचा आरोप

बसपा नेता अर्शद राणा यांनी आरोप केला आहे की, पक्षाने मला तिकीट देण्‍याची ग्‍वाही दिली होती. यासाठी मी ६७ लाख रुपये दिले आहेत. राणा यांच्‍या आरोपामुळे उमेदवारीसाठी लाखो रुपयांचे व्‍यवहार होत असल्‍याची बाब पुन्‍हा एकदा समोर आली आहे. हा व्‍हिडीओ व्‍हायरल झाल्‍यानंतर पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. मात्र याप्रकरणी कोणतेही भाष्‍य करण्‍यास स्‍थानिक पोलिसांनी नकार दिला.

मायावतींच्‍या निवासस्‍थानी आत्‍मदहन करण्‍याचा इशारा

आपल्‍यावर झालेल्‍या अन्‍यायासंदर्भात अर्शद राणा यांनी गुरुवारी(१३ जानेवारी) फेसबुकवर एक पोस्‍ट केली होती. यामध्‍ये त्‍यांनी म्‍हटलं होतं की, बहुजन समाज पार्टीचे पश्‍चिम प्रभारी शमसुद्‍दी रायन यांनी माझे ६७ लाख रुपये परत करावेत. त्‍यांनी माझे ६७ लाख रुपये परत केले नाहीत, तर बहुजन समाज पार्टीच्‍या प्रमुख मायावती यांच्‍या निवासस्‍थानासमोर मी आत्‍मदहन करेन, असा इशाराही त्‍यांनी या पोस्‍टमधून दिला होता.

हेही वाचलं का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news