पुढारी ऑनलाईन : नवरात्रीच्या गरब्याच्या आनंदाचं रूपांतर फरीदाबादमधील एका कुटुंबासाठी मात्र दु;खात झालं आहे. यावेळी झालेल्या वादादरम्यान एका व्यक्तीचं निधन झालं आहे. एका 53 वर्षीय व्यक्तीला वादात ढकलल्याने जीव गमवावा लागला आहे. प्रेम मेहता असं या दुर्दैवी पित्याचं नाव आहे. दोन युवक गरब्यादरम्यान एका मुलीची छेड काढत होते.
त्यावेळी मुलीच्या वडिलांनी त्यांना जाब विचारला. या दरम्यान त्या युवकांच्यात आणि मुलीच्या वडिलांमध्ये वाद झाला. या वादात युवकांनी त्या मुलीच्या वडिलांना खाली ढकलून दिलं. ही व्यक्ती खाली पडताच बेशुद्ध झाली. आसपासच्या लोकांनी या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पोलिसांनी या दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा :