पुणे; पुढारी वृत्तसेवा: एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यास गेलेल्या महिलेला दोघांनी नोटांचे नंबर तपासून घ्या, अशी बतावणीकरत १६ हजार रुपये लांबविले. ही घटना औंध परिसरात घडली. याप्रकरणी २६ वर्षीय महिलेने चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोघा अज्ञात चाेरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला औंध परिसरात राहण्यास आहेत. त्या एका बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यास गेल्या होत्या. त्यांनी ३८ हजार रुपये काढले. त्यात दोन हजार रुपयांच्या नोटा होत्या. याच दरम्यान दोन अनोळखी व्यक्ती एटीएमच्या सेंटरमध्ये आल्या. त्यांनी महिलेकडे नोटांचे नंबर तपासून घ्या, अशी बतावणी केली. यानंतर त्यांच्या हातातून नोटांचा बंडल घेतले.
नोटांचे नंबर तपासण्याचा बहाणा करून हातचलाखीने बंडलमधून दोन हजारांच्या ८ नोटा काढून घेऊन पलायन केले. काही वेळाने हा प्रकार महिलेच्या लक्षात आला. त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.
हेही वाचलंत का?