Antibiotic : कोरोना काळात विनामंजुरी अँटीबायोटीक्स औषधांचा अंदाधूंद वापर : ‘द लॅन्‍सेट’मधील संशाेधन अहवालातील माहिती

Antibiotic : कोरोना काळात विनामंजुरी अँटीबायोटीक्स औषधांचा अंदाधूंद वापर : ‘द लॅन्‍सेट’मधील संशाेधन अहवालातील माहिती
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कोरोना काळात देशात अझिथ्रोमाइसिन सारख्‍या अँटीबायोटीक्‍सचा (प्रतिजैविके) प्रमाणपेक्षा अधिक वापर करण्‍यात आला. तसेच या अँटीबायोटीक्‍स ( Antibiotic ) असणार्‍या काही औषधांची विनामंजुरीच विक्री करण्‍यात आल्‍याची धक्‍कादायक माहिती मेडिकल जर्नल द लॅन्‍सेटच्‍यामध्‍ये प्रकाशित झालेल्‍या संशोधन अहवालात देण्‍यात आली आहे. काही औषधांनी केंद्रीय औषध मानक नियंत्रण प्राधिकरणाने ( एसडीआरसी ) मंजुरीही दिली नसताना त्‍याची विक्री झाल्‍याचेही या अहवालात नमूद करण्‍यात आले आहे. हा अहवाल १ सप्‍टेंबर रोजी प्रकाशित झाला आहे.

Antibiotic असलेल्‍या औषधांची विनापरवानगी विक्री

अमेरिकेतील बॉस्‍टन विद्‍यापीठ आणि नवी दिल्‍लीमधील पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया या संस्‍थने खासगी रुग्‍णालयातील अँटीबायोटीसक्‍स वापराबाबत संशोधन केले. याचा अहवाल मेडिकल जनरल 'द लॅन्‍सेट'मध्‍ये प्रकाशित करण्‍यात आला आहे. या अहवालात म्‍हटलं आहे की, कोरोना काळ आणि त्‍यापूर्वी २०१९ मध्‍ये Azithromycin या अँटीबायोटीक्‍सचा वापर प्रमाणापेक्षा अधिक झाला आहे. हे संशोधन यासाठी महत्त्‍वाचे आहे कारण मानवाच्‍या शरीरात अँटीबायोटीक्‍सचा अतिरेक झाला तर त्‍याचा परिणाम कमी होवू लागतो. विनापरवानगी अँटीबायोटीक्‍स औषधाची विक्री झालेली आकडेवारी  ४७ टक्‍के आहे.  राष्‍ट्रीय आणि राज्‍य स्‍तरावरील विभागामधील यावर नियंत्रण आणणार्‍या यंत्रणेतील त्रुटीमुळे भारतात अँटीबायोटीक्‍स औषधाची उपलब्‍धता, विक्री आणि खप ही एक गुंतागुतीची प्रक्रिया झाली असल्‍याचेही अहवालात नमूद करण्‍यात आले आहे.

भारतातील खासगी क्षेत्रात अँटीबायोटीक्‍ससाठीच्‍या विक्री ही अन्‍य देशांच्‍या तुलनेने कमी आहे. मात्र भारतात Azithromycinचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. याचा वापर संतुलित पद्‍धतीने करणे आवश्‍यक असल्‍याची अपेक्षाही या संशोधन अहवालात व्‍यक्‍त करण्‍यात आली आहे.

संशोधनावेळी देशभरातील औषध विक्री डेटाचा अभ्‍यास करण्‍यात आला. यासाठी औषध उत्‍पादक कंपन्‍यांच्‍या प्रतिनिधींकडून औषध विक्रीची माहिती घेतली. यामध्‍ये स्‍पष्‍ट झाले की, २०१९ मध्‍ये डिफाइन्‍ड डोज ( प्रतिदिनाच्‍या लस) 5,071 मिलियन होती. कोरोना काळातील एकुण अँटीबायोटीक्सपैकी १२ अँटीबायोटीक्‍स असणार्‍या औषधांची प्रमाणापेक्षा अधिक विक्री झाली. देशातील औषध विक्रीचे आकडेवारी पाहिली तर Azithromycinचा वापर मोठ्या प्रमाणावर असल्‍याचे दिसून आले. यापाठोपाठ इफिक्‍सिम (cefixime) या अँटीबायोटीक्‍सचाही वापर झाल्‍याचे या संशाेधनात निदर्शनास आले आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news