पुढारी ऑनलाईन : बहुजन समाज पक्षाचे नेते राजू पाल यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार असलेल्या उमेश पाल यांच्या हत्या प्रकरणी संशयित आरोपी, माफिया अतिक अहमद याला आज (दि.२८) प्रयागराज 'एमपीएमएलए' न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सुनावणी दरम्यान न्यायालयाने संशयित आरोपी अतिक अहमदसह दिनेश पासी आणि खान सौलत हनिफ यांना दोषी ठरवले. तर भाऊ अश्रफसह इतर सात आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
उत्तर प्रदेश पोलीस आपणास इन्काउंटरमध्ये ठार मारतील, अशी भीती व्यक्त करीत अतिक अहमद याने सर्वोच्च न्यायालयाकडे संरक्षण मागितले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली. बहुजन समाज पक्षाचे आमदार राजू पाल यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार उमेश पाल याच्या हत्येप्रकरणी अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ यांना संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. अतिक अहमद याला आझ नैनी कारागृहातून न्यायालयात आणण्यात आले आहे. याप्रकरणी सुनावणी सुरू आहे.
उमेश पाल हत्याप्रकरणी आपल्या कुटुंबाला जाणीवपूर्वक गुंतवण्यात आले आहे, असा दावाही अतिकने याचिकेत केला आहे.
उमेश पाल हा २००५ मध्ये बहुजन समाज पक्षाचे आमदार राजू पाल यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार होता. फेब्रुवारी २०२३ मध्ये उमेश पाल आणि त्याचा सुरक्षारक्षक संदीप निषाद यांची धुमानगंजमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. उमेश न्यायालयातून घरी परतत असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. उमेश आपल्या घरासमोर कारमधून खाली उतरताच शुटरनी त्यांना चारही बाजूंनी घेरले आणि गोळीबार केला. यानंतर बॉम्बस्फोटही घडवून आणला होता. उमेश पाल आणि पोलीस कॉन्स्टेबल संदीप निषाद यांचा जागीच मृत्यू झाला होता. सुरक्षा रक्षक राघवेंद्र गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात अतिक अहमदचे नाव समोर आले आहे. यानंतर या प्रकरणात अतिक, अशरफ, अतिकचा मुलगा आणि त्याची पत्नी यांनाही आरोपी करण्यात आले आहे.
हेही वाचा :