पुढारी ऑनलाईन डेस्क : रशिया आक्रमण करेल, या भीतीने युक्रेन बुधवारी आणीबाणी जाहीर केली आहे आणि रशियामध्ये राहणाऱ्या आपल्या नागरिकांना मायदेशी बोलविले आहे. दुसरीकडे रशियाने किवमध्ये असणाऱ्या दूतावासाला रिकामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. कारण, दोन्ही देशांचे सैनिक मोठ्या संख्येने पूर्व युक्रेनच्या सीमेवर तैनात आहेत. (Russia v Ukraine)
युरोपीय संघाने युक्रेनमधील दोन वेगवेगळ्या क्षेत्रांना स्वतंत्र संस्थेच्या मान्यता दिल्यानंतर रशियाना त्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेण्यासाठी एक आपत्कालीन शिखर संमेलन बोलविले आहेत. दरम्यान, रशियाने युक्रेनवर आक्रमण करण्याची योजनेसंदर्भातील पुष्टी केलेली नाही. तसेच रशियाविरोधातीत कारवायांना त्यांनी इशारा दिला आहे.
बुधवारी युक्रेन ३० दिवसांचा आणीबाणी घोषीत केली आहे आणि रशियामध्ये राहणाऱ्या आपल्या नागरिकांना मायदेशी परत येण्याचे आवाहनही केलेले आहे. युक्रेनच्या पूर्व सीमेवरील वाढता तणावर पाहता ही आणीबाणी ३० दिवसांसाठी वाढवली जाण्याची शक्यता आहे. युक्रेनचे राष्ट्रपती वलोडिमिर जेलेंस्की यांनी सांगितले की, "रशिया पुढे काय करू शकेल, यासंदर्भात मी सांगू शकत नाही. तो विभक्तवादी किंवा रशियाचे राष्ट्रपती यांच्या वैयक्तिक निर्णयाचा भाग आहे." (Russia v Ukraine)
आणीबाणीच्या घोषणेबरोबर युक्रेनच्या राज्यांमध्ये परिवहन निर्बंध आणि मूळ ढाच्यासाठी अतिरिक्त सुरक्षा आणि होणाऱ्या हल्ल्यावर निर्बंघ लावण्याची क्षमता आहे. कर्फ्यू आणि इतर उपाय लागू करण्यासंबंधी क्षेत्रीय अधिकारी निर्णय घेऊ शकतात. आणीबाणीशिवाय युक्रेनने लढणाऱ्या सर्व जवानांना अनिवार्य सेवा द्यावी, अशीही मागणी केली आहे. युक्रेनच्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी युरोपीय संघाचे नेते आज आपत्कालीन शिखर संमेलन घेणार आहेत.
पहा व्हिडिओ : चारा घोटाळ्याचा न्याय…
हे वाचलंत का?