Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे म्हणाले, ”भाजपमुळेच काँग्रेसमध्ये गेलो”

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे म्हणाले, ”भाजपमुळेच काँग्रेसमध्ये गेलो”

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेच्या नाव आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे – उद्धव ठाकरे, असा वाद महाराष्ट्राच्या राजकारणात रंगला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. (Uddhav Thackeray)

आज काही लोक गळ्यात पट्टा बांधून त्यांच्यासोबत (भाजप) गेले, हे बाळासाहेबांनी कधी शिकवलं नाही. माझ्या वडिलांनी अन्यायासोबत लढायला शिकवलं. भाजपला लोकशाही मान्य नाही. सर्व संस्था लांडग्यांसारख्या विरोधकांवर सोडल्या आहेत. मी त्यांना कुत्रा म्हणत नाही कारण कुत्रे प्रमाणिक असतात. (Uddhav Thackeray)

विरोधकांना उद्देशून ते म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडी झाली. मात्र आम्हाला भाजपनेच काँग्रेससोबत जाण्यास भाग पाडले. कालच मी आव्हान दिले की तुम्ही चोरलेला धनुष्य घेऊन या मी मशाल घेऊन निवडणुकीत येतो. मी भाजपला सोडलं आहे मात्र हिंदुत्व नाही असे मत त्यांनी व्यक्त केले. माझ्या वडिलांनी जे शिकवले ते यांचे हिंदुत्व नाही. बाळासाहेबांनी सांगितलेलं हिंदुत्व आम्ही मानतो. आमचं हिंदुत्व राष्ट्रीयत्व, असंही ते यावेळी म्हणाले.

ते म्हणाले की, शिवसेनेचे धनुष्य आम्ही गद्दारांना दिले. मला लोकांच्या सोबत यायचे आहे. मी कधीच भेदभाव केला नाही मुख्यमंत्री असतांना पण इथे उपस्थित जे आहेत तेच १९९२-९३ साली मुंबई वाचवण्यात होते. तेच आज गुन्हेगार ठरवत. दरम्यान ते पुढे म्हणाले की, भाजपने मला काँग्रेसकडे जाण्यास भाग पाडले. मी तर आजही हिंदूच आहे. २०१४ साली त्यांनी युती तोडली. मी एकटा लढलो, ६३ आमदार निवडून आणले. त्यानंतर अमित शहा घरी आले. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करा असे मी म्हणणे मांडलेले होते. अमित शहा यांनी विश्वास देखील व्यक्त केला होता हे सर्वांना माहिती आहे.

एक स्वप्न बघून आपण ज्यांना सत्तेत आणले ते बलवान झाले, मात्र देश कमकुवत होत आहे. मुंबई, महाराष्ट्र हा केवळ माझा हेतू नाही देश वाचायला हवा. बुध्दिबळात पण नियम आहेत मात्र राजकारणात आज कोणी कसेही चालत आहे. प्रमोद महाजनांना बाळासाहेबांनी हिंदू म्हणून मतदार तयार होईल असे भाकीत केले होते. आता हिंदू जागा झाला तर भाजप धूळफेक करत आहेत. कधी हिजाब, कधी अजून काही. तुमचे सरकार असताना हिंदू जनआक्रोश मोर्चा का काढवा लागतो. मुस्लिम, उत्तर भारतीय कुणा सोबत आमचे भांडण नाही. जोपर्यंत आपला देश तुम्ही मातृभूमी मानत आहात तोपर्यंत आपण सगळेच भाऊ आहोत.

हेही वाचा;

logo
Pudhari News
pudhari.news