Uday Samant Tweet : “मी कुठंतरी वाचलंय रेडा हे…” उदय सामंतांचा राऊतांना टोला

Uday Samant Tweet
Uday Samant Tweet

पुढारी ऑनलाईन डेस्क : "पाच महिन्यांपूर्वी आम्ही चाळीस आमदार 'वाघ' होतो. आम्ही उठाव केला मा. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर आम्ही "रेडा" झालॊ. किती ती चिडचिड. "मी कुठंतरी वाचलंय रेडा हे यमाच वाहन आहे". असं ट्विट ( Uday Samant Tweet ) करत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी (Uday Samant) खासदार संजय राऊत यांना प्रत्‍युत्तर दिले.

चार ते पाच महिन्यांपूर्वी शिवसेनेतील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केले.  ते आसामची राजधानी गुवाहाटीला आमदारांसह गेले. एक एक करत शिवसेनेतील ४० हून अधिक आमदार एकनाथ शिंदे यांना मिळाले.  या गटाने गुवाहाटीतील तंत्र-मंत्र साधनेसाठी प्रसिद्ध असलेल्या कामाख्या (Kamakhya Temple) मंदिराला भेट दिली होती. त्यावेळी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु होत्या. खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांना रेडा असा उल्लेख केला होता. शनिवार, २६ नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यात शेतकरी मेळावा घेतला. यावेळी केलेल्‍या भाषणात संजय राऊत यांनी शिंदे गटाचा समाचार घेतला. या वेळी  त्यांनी पुन्हा एकदा शिंदे गटातील आमदारांचा उल्लेख "रेडा" असा केला.

काय म्हणाले होते राऊत ?

२६ नोव्हेंबर रोजी  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यात शेतकरी मेळावा घेतला. यावेळी खासदार संजय राऊत यांनीही आपली उपस्थिती लावली होती. जामीन मिळाल्यानंतरची  त्‍यांची ही पहिलीच जाहीर सभा होती. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून शिंदे गटावर चांगलाच निशाणा साधला. ते म्हणाले, " पेटलेल्या मशाली गद्दारांचे खोके बेचिराख केल्याशिवाय राहणार नाहीत. ही भूमी राष्ट्रमाता जिजाऊंची भूमी आहे. ज्या राष्ट्रमाताने आम्हाला छत्रपती हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवाजी राजा दिला. त्या भूमीत गद्दारीची बीजं रोवली आहेत.  गद्दारीची बीजं कायमची उखडून काढण्यासाठी या मशाली पेटलेल्या आहेत. या संतांच्या भूमीत ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवून घेतले; पण आता मुख्यमंत्री ४० रेड्यांचे बळी देण्यासाठी गुवाहाटीला गेले आहेत." पुन्हा एकदा त्यांनी शिंदे गटातील आमदारांना "रेडा" असा टोला लावून निशाणा साधला.

 Uday Samant Tweet : सामंतांचा ट्विट करत पलटवार 

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन सूचक ट्विटमधून संजय रावतांना पलटवार केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, "पाच महिन्यापूर्वी आम्ही चाळीस आमदार "वाघ" होतो. आम्ही उठाव केला मा. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर आम्ही "रेडा" झालॊ. किती ती चिडचिड. "मी कुठंतरी वाचलंय रेडा हे यमाच वाहन आहे".

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news