पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल आणि हमास यांच्या संघर्षात गाझामध्ये गेल्या १७ दिवसात दोन हजार मुलांनी जीव गमावला आहे. तसेच इंधनचा पुरवठा सुरळीत न झाल्यास रुग्णायलायात उपचार घेत असलेल्या अनेक मुलांचा काही सेकंदात मृत्यू होईल, अशी भीती गाझा येथील रुग्णालयांनी व्यक्त केली आहे. (Children Death in Gaza)
दरम्यान इस्रायलने हमासचा संपूर्ण खात्मा करण्यासाठी गाझा पट्टीत हवाई, जमिनीवरून आणि समुद्रातून कारवाईची संपूर्ण तयारी केली आहे, असे इस्रायलचे संरक्षणमंत्री योवाह गॅलंट यांनी म्हटले आहे. हमासने ७ ऑक्टोबरला इस्रायवर रॉकेट हल्ले केले, यात १४०० इस्रायली नागरिक ठार झाले, तर २०० नागरिकांना हमासने बंधक बनवले आहे. सोमवारी हमासने यातील दोन बंधकांना मुक्त केले आहे.
CNNने दिलेला वृत्तात म्हटले आहे, "पूर्ण गाझा पट्टीची इस्रायलने कोंडी केली आहे. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात घरे, शाळा, मशिदी उद्धवस्त झाली आहेत."
सेव्ह द चिल्ड्रन या संस्थेने गाझात दहा लाख मुले अडकली असल्याचे म्हटले आहे. गाझातील रुग्णालयांकडे पुरेसा इंधन पुरवठा नाही. गेल्या १७ दिवसांत किमान २ हजार मुले मारली गेली आहेत. तसेच वेस्ट बँक येथे २७ मुले ठार झाली आहेत," असे या बातमीत म्हटले आहे. पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गाझा एकूण ५०८७ लोकांचा मृत्यू झाला आहे, यात २०५५ मुलांचा समावेशआहे. (Children Death in Gaza)
इंधनाची नितांत आवश्यकता | Children Death in Gaza
गाझामध्ये इंधनाची सध्या नितांत आवश्यकता आहे. इंधन नसेल तर पाण्याचा उपसा करणे, त्यातील क्षार काढणे ही कामे ठप्प होतात. हॉस्पिटलमधील व्हेंटिलेटर, इन्क्युबेटर, डायलेसीस ही सगळी यंत्रणा जनरेटवर चालते. पण इंधन नसल्याने गाझातील ३२ पैकी १२ वैद्यकीय केंद्र बंद करण्यात आली आहेत. तर इस्रायलचे म्हणणे असे आहे की पॅलेस्टाईनमध्ये इंधन पुरवठा सुरळीत केला तर हेच इंधन हमास युद्धासाठी वापरेल.
हेही वाचा