शिवसेना नेत्यांवरील आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी दोघेजण ताब्यात; गुन्हा दाखल

file photo
file photo

पुढारी ऑनलाईन: शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे आणि महिला नेत्या, प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा आक्षेपार्हरित्या व्हिडिओ मॉर्फ करण्यात आला. यानंतर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आला. या प्रकरणी दहिसर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर आयपीसीतील कलम ३५४,५०९,५००,३४ आणि ६७ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

शिवसेनेतील दोन नेत्यांचा मॉर्फ केलेला आक्षेपार्ह व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल केल्याप्रकरणी अटक केलेल्या दोघांची नावे मानस कुवर (26) आणि अशोक मिश्रा (45) ही आहेत, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

शीतल म्हात्रे यांनी ट्विट करत मांडली भूमिका

शीतल म्हात्रे यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "राजकारणामधील महिलेसंदर्भात बोलण्यासारखे काही नसले तर तिचे चारित्र्यहनन करणे हेच उद्ध्वस्त गटाचे संस्कार आहेत? मातोश्री नावाच्या फेसबूक पेजवरुन एका स्त्री संदर्भात असा मॉर्फ व्हिडीओ अपलोड करताना बाळासाहेबांचे संस्कार नाही का आठवले?"

तसेच व्हिडिओमध्ये त्यांनी शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात एखाद्या स्त्रिला अशा पद्धतीने बदनाम करू शकतात. अशा विकृत कृत्यामुळे भाऊ-बहिणीचे नाते असलेल्या एखाद्या स्त्री-पुरुषाला समाज विकृत नजरेने बघत आहे. यामागे कुणाचं डोकं आहे आणि हे कोण करतंय याची आम्हाला पूर्ण कल्पना असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news