Twitter Deal : एलॉन मस्क शुक्रवारपर्यंत ट्विटर डील पूर्ण करणार?

Twitter Deal
Twitter Deal

पुढारी ऑनलाईन डेस्क : टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) आणि ट्विटर दीर्घकाळ प्रलंबित असलेला करार (Twitter Deal) आता लवकरच पूर्ण होऊ शकतो. शुक्रवार (ऑक्टोबर 28) पर्यंत ट्विटर इंकसह $44 अब्ज खरेदी पूर्ण करण्याची योजना आखत आहे. एलॉन मस्क यांनी सह-गुंतवणूकदारांना सूचित केले आहे की सोशल मीडिया कंपनी शुक्रवारपर्यंत फर्मची खरेदी पूर्ण करण्याची योजना आखत आहे, वृत्तसंस्था रॉयटर्सने याबाबतचे वृत्त दिले आहे. रॉयटर्सला कराराशी संबधित व्यक्तीने दिलेलेल्या माहितीनुसार, इक्विटी गुंतवणूकदार, सेक्वॉइया कॅपिटल, बिनन्स आणि कतार गुंतवणूक प्राधिकरण यांना एलॉन मस्कच्या वकिलाकडून वित्तपुरवठा वचनबद्धतेसाठी आवश्यक कागदपत्रे प्राप्त झाली आहेत.

Twitter Deal : अन्यथा  न्यायालयात

एलॉन मस्क यांना शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ट्विटर अधिग्रहण करार पूर्ण करावा लागेल, अन्यथा त्यांना न्यायालयात खटला सहन करावा लागेल. मस्कने उचललेले हे पाऊल म्हणजे ते शुक्रवारपर्यंत करार पूर्ण करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत आहे. तत्पूर्वी, डेलावेर कोर्टाने शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत करार अंतिम करण्याचे निर्देश दिले होते. जर मस्कने असे केले नाही तर त्याला खटल्याला सामोरे जावे लागेल. ब्लूमबर्ग न्यूजच्या वृत्तानुसार, ज्या बँकांनी मस्कच्या ट्विटर खरेदीसाठी एकत्रितपणे निधी देण्याचे वचन दिले आहे. त्यांनी अंतिम कर्ज वित्तपुरवठा करार पूर्ण केला आहे आणि आवश्यक कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्याच्या प्रक्रियेत आहेत.

अहवालानुसार, सोमवारी एका व्हिडिओ कॉन्फरन्स कॉल दरम्यान, मस्कने या करारात मदत करणाऱ्या बँकर्ससोबत ट्विटर करार पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मात्र, ट्विटरने या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तसेच मस्कचे वकील टिप्पणीसाठी त्वरित उपलब्ध नव्हते.

ट्विटर शेअर

ही बातमी आल्यानंतर ट्विटरच्या शेअरमध्ये मोठे बद्ल पाहायला मिळाले. मस्कच्या $54.20 च्या ऑफर किमतीच्या जवळ, ट्विटरचे शेअर्स मंगळवारी $52.95 वर तीन टक्क्यांनी वाढले होते. मस्कने संपादनासाठी $46.5 अब्ज इक्विटी आणि कर्ज वित्तपुरवठा करण्याचे वचन दिले आहे, ज्यामध्ये संपादन किंमत आणि बंद खर्चासाठी $44 अब्ज समाविष्ट आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news