Turkey earthquake : अन् येथे मृत्यू हरला; 128 तासांनंतरही ‘ते’ नवजात बाळ घराच्या ढिगार्‍याखाली जिवंत

TurkeyEarthquake
TurkeyEarthquake
Published on
Updated on

हेते प्रॉविन्स : तुर्की (TurkeyEarthquake) आणि सिरियात आलेल्या प्रलयंकारी भूकंपामध्ये मोठ्या प्रमाणात वित्त आणि जीवित हानी झाली आहे. अशा संकटाच्या काळातही तेथून काही सुखद घटनाही घडत आहेत. यास निसर्गाचा चमत्कारच म्हटला पाहिजे. तुर्कीमधील हेते प्रॉविन्समध्ये मातीच्या ढिगार्‍याखाली अडकलेले एक नवजात बाळ आपल्याच घराच्या ढिगार्‍याखाली तब्बल 128 तासांनंतरही जिवंत सापडले.

नवजात बाळाला वाचवण्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये हे बाळ मातीच्या ढिगार्‍यातून वाचवणार्‍या व्यक्तीच्या हातात असून त्याचे बोट चोखत असल्याचे दिसते. (TurkeyEarthquake) यापूर्वी एनडीआरएफने आठ वर्षांच्या मुलीला मातीच्या ढिगार्‍यातून सुरक्षितपणे बाहेर काढले होते.

भूकंपग्रस्त भागात तुर्कीच्या (TurkeyEarthquake) लष्करासमवेत एनडीआरफही बचाव आणि मदतकार्यात सहभागी झाले आहे. भूकंपग्रस्त तुर्की आणि सिरियातील दिवसेंदिवस अधिक खडतर बनत चालली आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये आतापर्यंत 28 हजार लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. भारतसही सध्या ऑपरेशन दोस्त मोहिमेंतर्गत तुर्की आणि सिरिया या भूकंपग्रस्त देशांना मदत पोहोचवत आहे. तसेच भारताची एनडीआरएफची पथके या दोन्ही देशांमध्ये मदत आणि बचाव कार्यात सहभागी झाली आहेत.

तुर्कीच्या (TurkeyEarthquake) हेते प्रॉविन्समध्ये आपल्याच घराच्या ढिगार्‍याखाली अडकलेले एक नवजात बाळाला तब्बल 128 तासांनंतर एनडीआरएफने सुरक्षितपणे बाहेर काढले. मात्र, तब्बल 128 तासांहून अधिक वेळ ढिगार्‍याखाली अन्न पाण्याविना बाळ जिवंत सापडणे हा एक मोठा चमत्कारच समजला जात आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news