Sculptures of Krishna : डोक्यावर मुकुट अन् हातात बासरी, चंद्रपुरात सापडली काळ्या दगडावर कोरलेली श्रीकृष्णाची सुरेख मुर्ती | पुढारी

Sculptures of Krishna : डोक्यावर मुकुट अन् हातात बासरी, चंद्रपुरात सापडली काळ्या दगडावर कोरलेली श्रीकृष्णाची सुरेख मुर्ती

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा :  शौचालय बांधकामासाठी खड्डा खोदणे सुरू होते. सात फूट खोल खड्डा खोदून झाला होता. अन् काळा दगड लागला. तो दगड बाहेर काढल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला. तो केवळ दगड नसून श्रीकृष्णाचे सुरेख शिल्प होत. शिल्प सापडल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी गर्दी केली. ब्रह्मपुरी तालुक्यात येणाऱ्या खेडमक्ता येथील गजानन मानकर यांना ही मूर्ती सापडली आहे. ही मूर्ती बाराव्या शतकातील असून चालुक्य काळातील असल्याचं इतिहास अभ्यासक अशोक सिंह ठाकुर यांनी सांगितलं. श्रीकृष्णाचे शिल्प सापडण्याची ही पहिलीच घटना आहे. (Sculptures of Krishna)

चंद्रपूर जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. अश्मयुगाच्या खानाखुणा चंद्रपुरात सापडतात मोर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, चालुक्य, नाग, परमार, गोंड, भोसले याची राजवट जिल्ह्यात होती. इतिहासाची साक्ष देत अनेक देखण्या वास्तू आजही जिल्ह्यात उभ्या आहेत. आता नव्याने चंद्रपूरच्या इतिहासात भर पडली आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच श्रीकृष्णाचे शिल्प सापडले आहे (Sculptures of Krishna). सापडलेले शिल्प चालुक्य काळातील असून बाराव्या शतकातील आहे. खेड मक्ता येतील गजानन मानकर यांना खोदकाम करताना ही मूर्ती सापडली. त्यांनी मूर्तीच दुग्धभिषक केलं. यावेळी प्रमोद मानकर, सचिन मेश्राम, गुरुदेव मानकर मारोती मेश्राम, गिरिधर गुरपुडे, मुकुंदा गुरपुदे, योगेश तुमडे, संदीप गुर्पुडे, केशव मानकर उपस्थित होते. मूर्ती सापडल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे.

दक्षिणात्य शैलीतील शिल्प

सापडलेले शिल्प दक्षिणात्य शैलीतील आहे. शिल्प काळ्या दगडावर कोरलेल आहे. श्रीकृष्णाचा डोक्यावर करंडक मुकुट असून हातात बासरी आहे. दोन्ही बाजूला दक्षिणात्य शैलीतील मंदिर कोरलेल आहे. चालुक्यकाळात या भागात श्रीकृष्णाच्या एखादं मंदिर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.या भागात अधिक संशोधन केल्यास इतिहासाला उजाळा मिळू शकतो.

हेही वाचा

Back to top button