काही मिनिटांचा प्रवास आणि माजी सैनिकांचं ह्रदय दिल्लीहून प्रत्यारोपणासाठी पुण्यात

काही मिनिटांचा प्रवास आणि माजी सैनिकांचं ह्रदय दिल्लीहून प्रत्यारोपणासाठी पुण्यात
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मध्य प्रदेशातील भिंड येथे 8 फेब्रुवारी रोजी 40 वर्षीय माजी सैनिकाला रस्ते अपघातात गंभीर दुखापत झाली. आधी उपचारांसाठी स्थानिक शासकीय रुग्णालयात आणि दुस-या दिवशी दिल्लीतील 'आर्मी हॉस्पिटल रिसर्च अँड रेफरल' सेंटरमध्ये हलवण्यात आले. डॉक्टरांनी 11 फेब्रुवारी रोजी रुग्णाला ब्रेन डेड घोषित केले. माजी सैनिकाच्या कुटुंबाने अवयवदान करण्यास सहमती दर्शवल्याने एका 29 वर्षीय महिलेला जीवनदान मिळाल. हृदय अवयदात्याच्या शरीरातून काढल्यानंतर त्याचे प्रत्यारोपण चार ते पाच तासांत होणे आवश्यक असते. मात्र, सैन्यदलाच्या यंत्रणेने आव्हान पेलत पुण्यात पोहोचण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. माजी सैनिकाचे हृदय दिल्लीहून विशेष विमानाने पुण्यात आणण्यात आले.

प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया शनिवारी (दि.11) पुण्यातील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्सेसमध्ये यशस्वीपणे पार पडली. 'एआयसीटीएस' मध्ये दोन आठवड्यांत ही दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. दक्षिण मुख्यालयातील वैद्यकीय पथकाने वेस्टर्न एअर कमांडच्या इम्ब—ाअर जेट या विशेष विमानाने हृदय लोहगाव विमानतळावर आणले. ग्रीन कॉरिडॉरद्वारे काही मिनिटांमध्येच हृदय घेऊन टीम एआयसीटीएसमध्ये दाखल झाली. त्यासाठी दिल्ली आणि महाराष्ट्र पोलिस दलाची विशेष मदत लाभली. 'एआयसीटीएस' मधील हृदयशल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख व भुलतज्ज्ञांनी काही तासांमध्येच सैनिकाच्या पत्नीमध्ये हृदय प्रत्यारोपित केले.

प्रत्यारोपणाशिवाय दुसरा पर्याय नव्हता
भारतीय सैन्यदलात सेवेत असलेल्या सैनिकाच्या 29 वर्षीय पत्नीचे हृदय अकार्यक्षम झाल्याने प्रत्यारोपणाशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. महिलेला 'डायलेटेड कार्डिओमायोपॅथी' हा आजार होता. तिच्यावर सहा महिन्यांपासून उपचार सुरू होते. प्रत्यारोपणासाठी हृदय उपलब्ध होईपर्यंत हृदयाला शॉक देणारे एक विशेष इंप्लांट बसवण्यात आले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news