देशातील १० रुग्णालयांत थॅलेसेमियाचे उपचार, सरकारकडून १० लाखांपर्यंतची मदत

देशातील १० रुग्णालयांत थॅलेसेमियाचे उपचार, सरकारकडून १० लाखांपर्यंतची मदत
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

थॅलेसेमिया हा रक्ताशी संबंधित आनुवंशिक आजार आहे. या आजाराच्या उपचारासाठी रुग्णांना केंद्र सरकारकडून १० लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाणार आहे. मुंबईतील दोन रुग्णालयांसह देशातील एकूण १० रुग्णालयांमध्ये ही सुविधा मिळणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली आहे.

उपक्रमाअंतर्गत सूचिबद्ध केलेल्या रुग्णालयांमध्ये मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालय आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांसह भारतातील दहा नामांकित रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे.

थॅलेसेमिया बाल सेवा योजनेअंतर्गतच्या तिसऱ्या टप्प्यात प्रति रक्तद्रव निर्मिती (प्लाझ्मा) मूल पेशी प्रत्यारोपणासाठी (Hematopoiesis stem cell treatment) 10 लाख रुपयांपर्यंतच्या खर्चासाठी मदत दिली जाणार आहे. ही मदत कोल इंडिया लिमीटेड करून रक्तद्रव निर्मिती (प्लाझ्मा) मूल पेशी प्रत्यारोपण करणाऱ्या संस्थांना थेट हस्तांतरित केली जाणार आहे. या उपक्रमामुळे वंचित घटकांमधील थॅलेसेमियाग्रस्त रुग्ण आणि वाढ खुंटवणाऱ्या अशक्तपणाने (Aplastic Anemia) ग्रस्त असलेल्या रुग्णांना मोठा लाभ होणार आहे. थॅलेसेमिया बाल सेवा योजना पोर्टलही सुरू करण्यात आले आहे. गरजू रुग्णांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. पवार यांनी केले आहे.

देशात ३५६ प्रकरणे यशस्वी

देशभरातील 10 सूचीबद्ध रुग्णालयांमध्ये, थॅलेसेमिया रुग्णांवरच्या अस्थिमज्जा प्रत्यारोपणाची (bone marrow transplants) 356 प्रकरणे यशस्वीरीत्या पूर्ण केली गेली आहेत. 'थॅलेसेमिया आणि सिकलसेलसारख्या रक्तविकारांचा सामना करण्यासाठी या आजाराशी संबंधित तपासण्या आणि चाचण्या वाढवणे, या आजारासंबंधी जनजागृती करणे, समुपदेशनाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि उपचारांच्या सोयी-सुविधा वाढविणे गरजेचे आहे, असे मत डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news