नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यानचा व्यापार करार येत्या 29 डिसेंबरपासून लागू होणार असल्याची माहिती ऑस्ट्रेलियाचे भारतातील राजदूत बॅरी ओ फारेल यांनी बुधवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. हा करार अंमलात आणण्यासाठी ऑस्ट्रेलियन सरकारने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली असल्याचेही फारेल यांनी नमूद केले.
व्यापार करारामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या संबंधाचे नवे पर्व सुरु होईल. भविष्यातील उभय देशांदरम्यानची मैत्री देखील यामुळे वृद्धींगत होईल, असे फारेल म्हणाले. मागच्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान ॲथनी अल्बनीस यांनी ऑस्ट्रेलियन संसदेत भारत-ऑस्ट्रेलिया व्यापार करार मंजूर केला आहे याबाबत माहिती दिली होती. 29 डिसेंबरपासून हा करार अंमलात येणार असून त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांना आपापल्या बाजारपेठांच्या गरजांची पूर्तता करणे शक्य होणार असल्याचे अल्बनीस यांनी सांगितले.
हेही वाचा