Tomato prices | येत्या काही दिवसांत टोमॅटो प्रतिकिलो ३०० रूपये पार करणार!

टोमॅटो
टोमॅटो

पुढारी ऑनलाईन : गेल्या काही महिन्यांपासून टोमॅटो दरात विक्रमी वाढ सुरूच आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत टोमॅटोचे दर 300 रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तसेच भाज्यांचे दरातही वाढ होणार आहे, असा अंदाज होलसेल व्यापारांनी व्यक्त केला आहे, असे वृत्त 'बिझनेस स्टॅडर्ड' ने (Tomato prices) दिले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे (एपीएमसी) सदस्य कौशिक यांनी सांगितले की, टोमॅटो, सिमला मिरची आणि इतर हंगामी भाज्यांची विक्रीत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे भाजीपाला घाऊक (होलसेल) विक्रेत्यांना तोटा सहन करावा लागत आहे. घाऊक बाजारात टोमॅटोचे भाव 160 रुपये किलोवरून 220 रुपये किलोवर पोहोचले आहेत, त्यामुळे किरकोळ बाजारातही भाव वाढू (Tomato prices) शकतात, असे ते म्हणाले.

मुख्य उत्पादक प्रदेशात अतिवृष्टीमुळे टोमॅटो पुरवठा विस्कळीत झाला आहे. एका महिन्याहून अधिक काळ टोमॅटोच्या किमती मोठ्या प्रमाणातच वाढत आहेत. हिमाचल प्रदेशात भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे भाजीपाल्याची वाहतूक करण्यात अडचणी येत आहे. उत्पादकांकडून भाजीपाला निर्यात करण्यासाठी नेहमीपेक्षा 6 ते 8 तास जास्त लागतात त्यामुळे टोमॅटोचा भाव जवळपास 300 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचू शकतो, अशी दाट शक्यता पीटीआयशी बोलताना व्यापारांकडून व्यक्त (Tomato prices) करण्यात आली.

ते म्हणाले की, हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून निर्यात होणाऱ्या टोमॅटो आणि इतर भाज्यांचा दर्जा घसरला आहे.
हिमाचल प्रदेशात जुलैमध्ये अतिवृष्टी झाली असून त्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे14 जुलैपासून , राष्ट्रीय राजधानीतील टोमॅटोच्या किरकोळ किमती नरमायला लागल्या होत्या. परंतु कमी पुरवठ्यामुळे आहे त्याच दरावर टोमॅटोच्या किंमती पुन्हा स्थिर झाल्याचे देखील होलसेल व्यापाऱ्यांकडून समजत आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news