TMC Leader Shahjahan Sheikh | मोठी बातमी: शाहजहान शेख यांच्यावर पक्षाची मोठी कारवाई, सहा वर्षांसाठी पक्षातून केले निलंबित

संदेशखाली महिला लैंगिक शाेषण प्रकरणातील आराेपी शहाजहान शेख.
संदेशखाली महिला लैंगिक शाेषण प्रकरणातील आराेपी शहाजहान शेख.

पुढारी ऑनलाईन डेस्क: सुमारे दोन महिन्‍यांहून अधिक काळ फरार असलेला तृणमूल काँग्रेसचा 'बाहुबली' नेता शेख शाहजहान ( Sheikh Shahjahan) याला संदेशखाली (Sandeshkhali Case) प्रकरणी अखेर आज ( दि. २९ फेब्रुवारी ) पहाटे पश्‍चिम बंगाल पोलिसांनी अटक केली. त्यानंतर तृणमूल काँग्रेसने त्यांच्याबाबतीत मोठा निर्णय घेत पक्षातून निलंबित करण्याची कारवाई केली आहे. (TMC Leader Shahjahan Sheikh)

कोलकाता येथील तृणमूल नेते डेरेक ओब्रायन यांनी सांगितले की, "तृणमूल काँग्रेसचे शाहजहान शेख यांना पक्षातून पुढील वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे". या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (TMC Leader Shahjahan Sheikh)

TMC Leader Shahjahan Sheikh: न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली

तृणमूल काँग्रेसने शाहजहान शेख यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. तृणमूल नेते डेरेक ओब्रायन यांनी कोलकाता येथे ही माहिती दिली. यापूर्वी पश्चिम बंगालमधील संदेशखळी हिंसाचारातील मुख्य आरोपी शाहजहान शेख याला गुरुवारी अटक करण्यात आली होती. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांच्या पथकावर हल्ला केल्यानंतर तृणमूल काँग्रेस (टीएमसी) नेता शेख फरार झाला होता. कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपीला बशीरहाट न्यायालयात हजर केले असता त्याला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (TMC Leader Shahjahan Sheikh)

पं. बंगालमधील राजकारण 'शेख शाहजहान' नावाभोवती ढवळून निघाले

पं. बंगालमधील तृणमूलचे शाहजहान शेख यांच्या अटकेसाठी भाजपने राज्‍य सरकारविरोधात आंदोलन छेडले. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजपमध्‍ये आरोप-प्रत्‍यारोपांच्‍या फैरी झडल्‍या. ग्रामस्‍थांसह महिलांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. या प्रकरणी दाखल याचिकांवरील सुनावणीवेळी पश्‍चिम बंगाल सरकारला कोलकाता उच्‍च न्‍यायालयाने फटकारलेही. एकूणच, मागील काही दिवस पश्‍चिम बंगालमध्‍ये शेख शाहजहान या नावाभोवती सारे राजकारण ढवळून निघाले. (TMC Leader Shahjahan Sheikh )

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news