पुणे : पुढारी ऑनलाईन
'माझा काटेवाडीचा गोठा, माळेगावच काम बघा एकदा येऊन….काय केलय हे? कुठं जमीन खालीवर, कुठ पाईप फुटलेत… जरा नीट काम करा…. मला सांगा ना हे पाहिजे, इतका निधी पाहिजे पुरवणी मागण्यात देतो ना… पण हे काय?… जरा चांगलं करा,' अशा शब्दात अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावले.
पुणे येथील कृषी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या गोधन २०२२ देशी गोवंश प्रदर्शन व प्रात्यक्षिक कार्यर्कमाच्या उद्घाटनासाठी अजित पवार कार्यक्रमसथळी पोहोचले आणि तेथील अवस्था बघून त्यांनी जागच्या जागीच अधिकाऱ्यांची शाळा घेतली.
ते म्हणाले, 'मला अशा कार्यक्रमाला बोलावताना दहा वेळा विचार करा. हा बाबा आला की आपला पंचनामा करेल की काैतुक करेल! कसयं कोणतीही गोष्ट करण्यासाठी आवड पाहिजे. आवड असल्या शिवाय काही होत नाही.' यावेळी त्यांनी प्रदर्शची माहीती घेत अनेक स्टॉलला भेटही दिली.