आर्यनचं नव्हे तर समीर वानखेडेंनी ‘या’ सेलिब्रिटींवरही केली कारवाई

आर्यनचं नव्हे तर समीर वानखेडेंनी ‘या’ सेलिब्रिटींवरही केली कारवाई
Published on
Updated on

ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अटक झाल्यानंतर रोज नवे अपडेट समाेर येत आहेत. या प्रकरणी चर्चेत आलेले एनसीबी अधिकारी म्हणजे समीर वानखेडे. ड्रग्‍ज पार्टीच्‍या संशयावरुन एनसीबीने २ ऑक्टोबर रोजी मुंबईवरील कॉर्डिलिया क्रूझवर छापा टाकला. आर्यन खान, मुनमुन धमेचा, अरबाझ मर्चंटसह ८ जणांना ताब्यात घेण्यात आले. चौकशी करून त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान समीर वानखेडे यांच्यावर ड्रग्‍ज प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांनी आरोपही केले. पण, धाडसी अधिकारी म्हणून नावाजलेले वानखेडे यांच्याकडे आर्यनची पहिलीच केस नाहीय. त्याआधी त्‍यांनी अनेक सेलिब्रिटींवर धडक कारवाई केली आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत. मलिकांनी वानखेडेंची फॅमिली हिस्ट्री सर्वांसमोर आणलीय.

समीर वानखेडे
समीर वानखेडे

दुसरीकडे, वानखेडे यांनी अनेक सेलिब्रिटींची वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये चौकशी केली होती. बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांना त्यांच्या चौकशीला सामोरं जावं लागलंय.

आर्यन खानच्या आधी १२ सेलिब्रिटींची चौकशी वानखेडेंनी केलेली आहे.

शाहरुख खान

शाहरुख खानला जुलै, २०११ रोजी त्याच्या कुटुंबीयांसह विमानतळावर थांबवण्यात आलं होतं. त्यावेळी शाहरुख खानची फॅमिली लंडनहून परत आली होती. मर्यादेपेक्षा जास्त साहित्य आणल्यामुळे त्याला दीड लाखांचा दंड भरावा लागला. त्यावेळी कस्टमच्या टीमचे प्रमुख वानखेडे होते.

कॅटरीना कैफ

कॅटरीना कैफला २०२१ मध्ये मुंबई विमानतळावर अडवलं होतं. फॉरेन एक्स्चेंज रेग्युलेशन ॲक्टच्या अंतर्गत त्याला १२ हजार रुपयांचा दंड भरावा लागला होता. लगेज क्लेम न करता तिने एक्झिट घेतली होती. तिच्याकडे दोन बॅगा सापडल्या. त्यात एक आयपॅड, दोन व्हिस्की बॉटल, ३० हजार रुपये कॅश हाेती.

मिनिषा लांबा

मिनिषा लांबा हिलाही मुंबई विमानतळावर २०११ मध्ये रोखण्यात आलं होतं. कस्टम डिपार्टमेंटने तिला अडवलं होतं. तिची चौकशी केल्यानंतर तिच्या बॅगेतून डायमंड ज्वेलरी, किंमती स्टोन मिळाले. या वस्तूंची किंमत ५० लाखांच्या जवळपास होती. या प्रकरणी वानखेडेंनी मिनिषा लांबाची १६ तास चौकशी केली होती.

मिका सिंग

२०१३ मध्ये गायक मिका सिंग बँकॉकहून परत येत होता. मिकाच्या बॅगेत ९ लाख रुपयांचं सामान होतं. त्याची माहिती मिकाने दिली नव्हती. तो तसाच एअरपोर्टच्या बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होता. त्यावेळी कस्टमने त्याला अडवून चौकशी केली होती. त्याच्या बॅगेत मद्याच्या बाटल्या, गॉगल्स आणि परमफ्युम्स सापडले होते.

अनुराग कश्यप

वानखेडे सर्व्हिस टॅक्स डिपार्टमेंटचे डेप्युटी कमिश्नर होते. त्यावेळी २०१३ मध्ये अनुराग कश्यपला टॅक्स इन्वेशनसंदर्भात ५५ लाखांचा दंड भरावा लागला होता. अनुराग कश्यपचं अकाऊंटही डिसेंबरमध्ये सील करण्यात आलं होतं.

विवेक ओबेरॉय

अनुराग कश्यपच्या या केसनंतर एक महिन्याने विवेक ओबेरॉयलाही सर्व्हिस टॅक्स डिपार्टमेंटद्वारे कर चुकवल्याप्रकरणी पकडण्यात आलं होतं. त्याच्यावर ४० लाखांच्या उत्पन्नात कर चुकवल्याचा आरोप होता.

अनुष्का शर्मा

अभिनेत्री अनुष्का शर्माला २०११ मध्ये मुंबई विमानतळावर थांबवण्यात आलं होतं. त्यावेळी अनुष्का शर्माकडे असलेल्या बॅगा वानखेडेंच्या टीमने तपासल्या होत्या. अनुष्काच्या बॅगेत डायमंड ब्रेसलेट, नेकलेस, इअर रिंग्ज, २ घड्याळे मिळाली होती. त्यावेळी अनुष्काची ११ तास चौकशी केली होती.

रणबीर कपूर

रणबीर कपूर २०१३ मध्ये ब्रिटीश एअऱवेजच्या फ्लाईटने लंडनहून मुंबईला आला होता. त्यावेळी ज्या मार्गाने फक्त विमानतळ कर्मचारी आणि अधिकारी जाऊ शकतात. त्या मार्गाने तो जात होता. त्यावेळी त्याच्या बॅगेत १ लाखांहून अधिक किंमतीचे साहित्य होते. ४० मिनिटांची चौकशी झाली. ६० हजारांचा दंड भरल्यानंतर त्याची सुटका झाली होती.

बिपाशा बसू

बिपाशा बसूलाही मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर वानखेडेंच्या टीमने अडवलं होतं. तिच्याकडे ६० लाखांपेक्षा जास्त किंमतीचं साहित्य मिळालं होतं. चौकशीनंतर तिला १२ हजार रुपये दंड भरावा लागला होता.

दीपिका पदुकोण

सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील ड्रग्ज केलमध्ये दीपिका पदुकोणची चौकशी झाली होती. श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंग यांनाही एनसीबीने समन्स पाठवलं होतं.

रिया चक्रवर्ती

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवतीचं नाव समोर आलं होतं. ८ सप्टेंबर, २०२० रोजी ड्रग्ज प्रकरणात तिला अटक करण्यात आली होती. ही कारवाई वानखेडे यांनींच केली होती.

अधिक वाचा-

अरमान कोहली

अभिनेता अरमान कोहली ड्रग्ज प्रकरणात सापडला होता. त्यावेळी ऑगस्ट २०२१ मध्ये त्याला ड्रग्ज प्रकरणात अटक झाली होती. ही कारवाईही वानखेडेंनी केली होती.

अरमान कोहली
अरमान कोहली

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news