Devendra Fadnavis | ओबीसींवर अन्याय नाही,आरक्षणाच्या मुद्यावर राजकारण नको : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis | ओबीसींवर अन्याय नाही,आरक्षणाच्या मुद्यावर राजकारण नको : देवेंद्र फडणवीस

नागपूर, पुढारी वृत्तसेवा  : आमचे सरकार ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही, दोन समाज आमने-सामने येतील असे कुठलेही पाऊल उचलणार नाही , कुणी तसा प्रयत्नही करू नये, किंबहुना आरक्षणाच्या मुद्यावर राजकारण न होता सर्वंकष असा निर्णय व्हायला हवा, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्व नागपुरात सरकार आपल्या दारी कार्यक्रमात आल्यानंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. (Devendra Fadnavis )

Devendra Fadnavis : प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार

मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांनी पाणी पण न घेण्याचो टोकाची भूमिका घेतली यासंदर्भात छेडले असता प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना विनंती केली असल्याकडे लक्ष वेधले. दरम्यान, या मुद्यावर आज (दि.११) सरकारच्या वतीने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन मुंबईत सायंकाळी करण्यात आले आहे. यासंदर्भात  भाष्य करताना फडणवीस यांनी सांगितले की, सर्वांनी मिळून एकमताने या प्रश्नावर विचार करण्यासाठी व त्यातून तोडगा काढण्यासाठीच ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

सर्वांना मिळून या प्रश्नावर मार्ग काढावा लागेल

फडणवीस म्हणाले की, जालना येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर समाजातील अनेक प्रश्न पुढे आले आहेत. त्यांचाही विचार या निमित्ताने बैठकीत होणार आहे. आरक्षणावर राजकारण न होता समाजाच्या हिताचा निर्णय कसा होईल, याचेच प्रयत्न होणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांना आवाहन केले आहे. लोकशाहीत आंदोलनाला मान्यता आहे आणि पद्धत देखील आहे. सर्वांना मिळून या प्रश्नावर मार्ग काढावा लागेल. सरकारला सर्वोच्च न्यायालय, कायदाचा विचार करावा लागतो. प्रश्न सोडविण्यासाठी ते कायद्याच्या चौकटीत टिकले पाहिजे, याचाही विचार सरकारला करावा लागतो. अन्यथा आमची फसवणूक झाली, असे समाज म्हणेल, याकडेही फडणवीस यांनी आवर्जून लक्ष वेधले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news