G20 Summit 2023 : वेश नव्हे हा, ही तर सखे, या देशाची शान गं…; जी-२० त वेधले साड्यांनी लक्ष! | पुढारी

G20 Summit 2023 : वेश नव्हे हा, ही तर सखे, या देशाची शान गं...; जी-२० त वेधले साड्यांनी लक्ष!

वेश नव्हे हा, ही तर सखे, या देशाची शान गं…
तुझी छान, की माझी छान?
अगं… साडीच असते छान गं..!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : जी-20 परिषदेमध्ये यजमानांसह अनेक विदेशी पाहुण्याही साडीत दिसल्या. मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद जुगनाथ यांच्या पत्नी कोबिता, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या पत्नी तसेच बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी साडी परिधान केलेली होती.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) व्यवस्थापकीय संचालिका क्रिस्टलिना जॉर्जिया या सलवार-कुर्त्यात तर उप व्यवस्थापकीय संचालिका गीता गोपीनाथ निळ्या साडीत होत्या. भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या पत्नी क्योको याही साडीतच होत्या. शेख हसीना यांची कन्या सायमा वाजेब यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत एक सेल्फीही घेतला. भारत मंडपातील नालंदा विद्यापीठाच्या (आरास) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विद्यापीठाबद्दलची माहिती बायडेन तसेच ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनाक यांना दिली.

मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद जुगनाथ यांच्या सौभाग्यवती कोबिता (हिरव्या साडीत) परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्या पत्नी क्योको (पिवळी साडी) यांच्यासह.

भोजनादरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा तसेच त्यांच्या पत्नी युको किशिदा (हिरव्या साडीत)

गर्द निळ्या साडीत आयएमएफच्या उप व्यवस्थापकीय संचालिका नीता गोपीनाथ.

Back to top button